माझी बायको काय म्हणाली आठवत नाही, पण… जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?

| Updated on: Nov 03, 2024 | 9:12 PM

अजितदादा पवार यांनी गेल्यावेळी साहेबांना खुश केले आता विधानसभेला मला खूश करा असे आवाहन मतदारांना केलेले आहे. यावर प्रतिक्रीया देताना जितेंद्र आव्हाड यांनी कोणाला खुश करायचं हे बारामतीकरांना चांगलं माहित आहे, बारामतीकर साहेबांच्या तालमीत तयार झालेत अशी प्रतिक्रीया दिली आहे.

माझी बायको काय म्हणाली आठवत नाही, पण... जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?
जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार
Follow us on

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुमच्यात खरी मदार्नगी असती तर तुम्ही स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढविली असती, राष्ट्रवादीचे चिन्ह पळवलं नसतं अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना आपण जे बोललो ते खरं आहे.ते घड्याळ आमचं होतं साहेबांनी मिळवलेलं घड्याळ होतं, यांनी साहेबांना जेव्हा पक्षाच्या बाहेर काढलं तेव्हा पक्ष घेतला आणि जाता जाता साहेबांच्या हातातलं घड्याळ ही चोरलं.आमच्या मुंबईच्या भाषेत त्याला पाकीट मार म्हणतात, ते पाकीट मार आहेत, घड्याळ चोरला नसतं तर मी त्यांना पाकीटमार म्हटलं नसतं. घड्याळ चोरले आणि त्यांना पोलीसही पकडत नाहीत. पोलीस म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त, हे त्यांच्याबरोबर आहेत. मी जे बोललो ते चुकीचं काहीच बोललेलो नाही, एवढं मनाला लावून घेऊ नका असेही यावर आव्हाड यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे.

आपण आपल्या शब्दांवर ठाम असून मला कोणीही उत्तर द्या, उत्तर देण्यासाठी कुठेही सभा घ्या, लोकशाही आहे लोकशाहीत कोणाला कुठेही सभा घेण्याची परवानगी आहे, कोणाला जे काय बोलायचं आहे ते बोलू द्या मी प्रत्येकाला उत्तर द्यायला तयार असतो असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. हे साहेबांची शेवटची सभा कधी होणार आहे ? असे म्हणत आहेत.साहेबांच्या पार मरणापर्यंत पोहचले आहे. आणि आम्ही काहीच बोलायचं नाही का ? असेही आव्हाड यावेळी म्हणाले. तुम्ही गेल्या पाच दिवसात साहेबांवर तीन वेळा बोललात. सत्यवादी आर.आर. पाटलांवरती बोललात, गेलेल्या माणसाबद्दल काही ऊन धुणं काढायचं असतं का? साहेबांमुळे तुम्ही किती वेळा वाचलात काय काय झालं हे सगळ्यांना माहित आहे तरी तुम्ही साहेबांवर बोलता ना. 85 वर्षाच्या माणसाला इथं काय दुखत असेल तुम्ही तरी ओळखायला पाहिजे होतं. तुमच्या घरातल्या रक्ताचं नातं होतं ना आणि तुम्हीच म्हणता शेवटचं भाषण कधी होणार आहे ?

देशातला पहिला अतिरेकी नथुराम

संघावरती केलेल्या टीकेबद्दल बोलताना आव्हाड यांनी आपण संघावर आज टीका करत नाही, तर मी समजायला शिकलो तेव्हापासून करत आहे. नथुराम गोडसे हा हिंदू महासभेचा माणूस होता हे दाखवण्यात आलं, पण मग गांधीजींची हत्या झाल्यानंतर पेढे कोणी वाटले. वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदीचं पत्र लिहिलं आहे, भले हत्या तुम्ही केली नाही तरी देशभरात असं वातावरण निर्माण केले. त्यातून गांधीजींची हत्या झाली,वल्लभभाई पटेल यांच पत्र आजही पुस्तकात आहे असेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले. नथुराम गोडसेने केलय ते केलंच आहे, त्यानेच गांधीजींना गोळ्या मारल्या, गांधीजींना तीन गोळ्या मारणारे कोण होते, या देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे आहे असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

बायको काय म्हणाली ते आठवत नाही, पण

अजितदादांमुळे आव्हाड यांना मंत्रीपद मिळाल्याच्या आरोपावर आव्हाड म्हणाले की माझी बायको काय म्हणाली ते मला आठवत नाही, पण मला आयुष्यात जे काही मिळालं 87 साला पासून ते फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांमुळे मिळालेले आहे हे मी कायम बोलत आलेलो आहे आणि मरेपर्यंत बोलत राहील असेही आव्हाड यावेळी म्हणाले. मी आज जिथे आहे जो आहे ते फक्त माननीय शरद पवारांमुळे, हे मी कधीही अमान्य करत नाही. बाकीच्यांचा किती वाटा आहे हे मी तोंडावर सांगतो. मला भुजबळांनी खूप मदत केली, या पक्षात खऱ्या अर्थाने मला जर कोणी मदत केली असेल तर फक्त भुजबळांनी केली, साहेबांनी केली, प्रफुल पटेल यांनी केली, बाकी या पक्षात माझं काय घेणं देणं आहे.कायम मला हिडीस फिडीस वागणूक देणारे, मी काय विसरलेलो नाही सगळं, केबिनच्या बाहेर उभं ठेवणारे, माझं सगळं लक्षात आहे. पण साहेबांनी जेवढे मला प्रेम दिलंय तेवढं प्रेम मला कधी कुठे मिळालेलं नाही. शेवटी माणूस प्रेमाचा,सन्मानाचा भुकेला असतो, पैसे येतात, जातात पण साहेबांसारखं प्रेम मिळणं फार अवघड आहे असेही आव्हाड यांनी सांगितले.