जुन्नरच्या हापूस आंब्याला मिळाली अखेर नवी ओळख, आता ‘या’ नावानं ओळखला जाणार

| Updated on: Dec 05, 2024 | 8:46 PM

जुन्नरमध्ये उत्पादीत होणाऱ्या या हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळावं यासाठी गेल्या दहा वर्षांपासून नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी  ११५ वर्षांपूर्वीच्या झाडाची नोंद करून, शास्त्रीय पद्धतीने तपासणी करण्यात आली.

जुन्नरच्या हापूस आंब्याला मिळाली अखेर नवी ओळख, आता या नावानं ओळखला जाणार
Follow us on

जुन्नरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. जुन्नरच्या हापूस आंब्याला अखेर नवी ओळख मिळाली आहे. जुन्नर भागातील या हापूस आंब्याला “शिवनेरी हापूस मँगो” असं जीआय मानांकन मिळालं आहे. कोकणात देखील हापूस आंब्याचं उत्पादन होतं. त्यामुळे हापूस या नावावरून वाद सुरू होता. त्यामुळे जुन्नर परिसरात उत्पादीत या आंब्याला हापूस अशी ओळख मिळत नव्हती. मात्र या आंब्याला नवी ओळख मिळावी यासाठी दहा वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर आता यश आलं आहे.  जुन्नरच्या हापूस आंब्याला अखेर नवी ओळख मिळाली आहे. जुन्नर भागातील या हापूस आंब्याला आता “शिवनेरी हापूस मँगो” असं जीआय मानांकन मिळालं आहे. त्यामुळे जुन्नरकरांकडून समाधान व्यक्त होतं आहे.

जुन्नरच्या हापूस आंब्याला नवी ओळख मिळावी, जीआय मानांकन मिळावं यासाठी गेल्या दहा वर्षांपासून नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून प्रयत्न सुरू होते. मात्र हापूस या नावावरून वाद सुरू असल्यानं जीआय मानांकन मिळण्यास अडचण येत होती, मात्र या लढ्यात अखेर आता यश आलं आहे. जुन्नर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात प्राचीन काळापासून हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते. हे आंबे देखील त्यांच्या चवीसाठी आणि रंगासाठी प्रसिद्ध आहेत.

जुन्नरमध्ये उत्पादीत होणाऱ्या या हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळावं यासाठी गेल्या दहा वर्षांपासून नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी  ११५ वर्षांपूर्वीच्या झाडाची नोंद करून, शास्त्रीय पद्धतीने तपासणी करण्यात आली. त्यानंतर  जुन्नरच्या हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळालं आहे. आता जुन्नरचा हापूस हा “शिवनेरी हापूस मँगो”  म्हणून ओळखला जाणार आहे.