Municipal election 2022 : कल्याण-डोंबवलीचे लॉटरी पध्दतीने महिला आरक्षण सोडत, 67 जागा महिलांसाठी

| Updated on: Jun 17, 2022 | 2:52 PM

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकूण नगरसेवक संख्या ही 133 एवढी आहे तर 44 प्रभाग असून यामध्ये 4 चे एक पॅनल तर 43 पॅनल हे तीनचे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचे चित्र कसे राहणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले होत. मात्र, 31 मे रोजी आरक्षण सोडत झाल्याने चित्र तर स्पष्ट झाले आहे. आता मैदान कोण मारणार हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल. महापालिकेसाठी 133 नगरसेवकांची संख्या असली तरी 67 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत.

Municipal election 2022 : कल्याण-डोंबवलीचे लॉटरी पध्दतीने महिला आरक्षण सोडत, 67 जागा महिलांसाठी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
Follow us on

कल्याण डोंबिवली : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कल्याण डोंबिवली पालिकेचं इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण असे असणार आहे.

महिलांसाठी 50 टक्के आरक्षण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकूण नगरसेवक संख्या ही 133 एवढी आहे तर 44 प्रभाग असून यामध्ये 4 चे एक पॅनल तर 43 पॅनल हे तीनचे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचे चित्र कसे राहणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले होत. मात्र, 31 मे रोजी आरक्षण सोडत झाल्याने चित्र तर स्पष्ट झाले आहे. आता मैदान कोण मारणार हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल. महापालिकेसाठी 133 नगरसेवकांची संख्या असली तरी 67 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवणूकीसाठी आज महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महिला उमेदवारांसाठी एकूण प्रभागांपैकी 50 टक्के आरक्षणानुसार 67 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत.

कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण

अनुसूचित जातीसाठी लोकसंख्येच्या निकषानुसार 13 प्रभाग आरक्षित करण्यात आले होते. त्यापैकी सात प्रभागांकरीता महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सोडतीपश्चात प्रभाग 4-अ, 6-अ, 7-अ, 17-अ, 20-अ, 23-अ, 43-अ हे प्रभाग अनसूचित जातच्या महिला उमेदवारांकरीता आरक्षित झाले आहेत.
अनूसूचित जमातीसाठी चार प्रभागापैकी दोन प्रभाग महिलांसाठी सोडत काढली गेली. त्यामध्ये प्रभाग 6-ब आणि 19-ब हे दोन प्रभाग अनूसूचित जमातीच्या महिला उमेदवारांकरीता आरक्षित करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

अशी पार पडली आरक्षणाची प्रक्रिया

अनूसूचित जाती जातीच्या महिला आरक्षीत झालेले 9 प्रभाग वगळता 58 प्रभागांचे आरक्षण काढायचे होते. मात्र 58 प्रभागांपैकी निवडणूक आयोगाने 42 जागा सर्वसाधारण महिला उमेदवारांकरीता आरक्षित केल्या होत्या. त्यामध्ये प्रभाग 1-अ, 2-ब, 3-अ, 4-ब, 5-ब, 7-ब, 8 ते 14-अ, 15-ब, 17-ब, 18-अ, 20 ते 23-ब, 25-ब, 24-अ, 26 ते 42-अ, 43 आणि 44-ब यांचा समावेश होता. यापैकी 44 क्रमांच्या पॅनलमध्ये चार प्रभाग असल्याने समसमान आरक्षण वाटपाच्या सूत्रनुसार त्यातील दोन प्रभाग हे थेट महिलांसाठी आरक्षित केले गेले. उर्वरीत 15 प्रभागांकरीता आरक्षण सोडत पद्धतीने करण्यात आले. त्यामध्ये प्रभाग 3-ब, 8-ब, 10-ब, 11-ब, 13-ब, 14-ब, 24-ब, 27 ब, 28-ब, 30 ब, 32-ब, 34-ब, 36-ब, 35-ब आणि 41-ब यांचा समावेश आहे.

महानगरपालिका एकूण नगरसेवक संख्या – 133

अनुसूचित जाती –
एकूण जागांची संख्या – 13
पैकी महिलांसकरीता आरक्षित जागा – 7

अनुसूचित जमाती
एकूण जागांची संख्या – 4
पैकी महिलांकरीता आरक्षित जागा – 2

सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी)
एकूण जागांची संख्या – 116
पैकी महिलांसाठी आरक्षित जागा – 58

प्रभाग संख्या – 44

चार चे पॅनल – 1

तीन चे पॅनल – 43

कोणत्या पालिकेचं सध्याचं पक्षीय बलाबल काय?

शिवसेना – 52
भाजप – 42
काँग्रेस – 04
राष्ट्रवादी काँग्रेस – 02
मनसे – 09
एमआयएम – 01
एकूण – 122