कल्याण : कल्याणमध्ये तळीराम जीप चालकाचा भलताच पराक्रम पाहायला मिळाला. मद्यधुंद अवस्थेत चालक हलत-डुलत गाडी चालवत होता. पादचारी आणि इतर वाहन चालकांच्या आरडाओरड्यानंतर तो काही वेळ थांबला. मात्र एका क्षणी त्याला झोप इतकी अनावर झाली, की गाडी भर रस्त्यातच उभी करुन तो झोपून गेला. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. (Kalyan Drunk Jeep Driver Sleeps in Car after Parking on Road)
पादचाऱ्यांच्या आरडाओरड्यानंतर जीप थांबवली
कल्याण-भिवंडी रस्त्यावर महिंद्र जीप चालकाने हा प्रताप केला. गाडी चालक ‘हले-डुले’ करत गाडी चालवत होता. दोन तीन गाड्या अपघात होण्यापासून वाचल्या. काही नागरिकांनी आरडाओरडा केल्यावर त्या चालकाने सहजानंद चौकात भर रस्त्यातच गाडी थांबवली.
गाडी रस्त्यातच पार्क करुन डुलकी
जीप चालक हा यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. तो गाडी कुठून कुठे घेऊन जात आहे, याचीही त्याला शुद्ध नव्हती. गाडी रस्त्यात उभी करुन तो झोपला. जवळ असलेल्या सहजानंद पोलिस चौकातून महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले. या मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले.
कल्याणला सामान पोहचवल्यानंतर मद्यपान
राजेश राठोड असे या चालकाचे नाव आहे. तो भिवंडीहून कल्याणला आला होता. सामान सोडून झाल्यानंतर तो दारु प्यायला. त्यानंतर तो कल्याणहून भिवंडीकडे जायला निघाला होता. सध्या चालकाच्या विरोधात पोलिसांनी कारवई केली आहे. मात्र ही गाडी वेळेत थांबवल्याने मोठा अपघात टळला. नाही तर मद्यधुंद चालकाने कोणाचा तरी जीव घेतला असता. (Kalyan Drunk Jeep Driver Sleeps in Car after Parking on Road)
पाहा व्हिडीओ :
धुळ्यात मद्यधुंद महिलेचा धिंगाणा
मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्यात महिला आणि पुरुषाने दारु पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. विशेष म्हणजे चौकशीसाठी आलेल्या पोलिसाचीच कॉलर पकडून महिलेने त्यांना धक्काबुक्की केली होती. संबंधित महिला आणि पुरुष दीर-भावजय असल्याचं समोर आलं होतं.
संबंधित बातम्या :
VIDEO | मुंबई-आग्रा महामार्गावर मद्यधुंद दीर-भावजयीचा धिंगाणा, महिलेची पोलिसांना धक्काबुक्की
नाशिकमध्ये मद्यधुंद पोलिसांचा राडा, स्वत: गाडी ठोकून दुसऱ्या ड्रायव्हरला मारहाण
कारखान्याचा गळित हंगाम संपल्याने धिंगाणा, कोल्हापुरात ट्रॅक्टर चालकांनी चिअर गर्ल्स नाचवल्या
(Kalyan Drunk Jeep Driver Sleeps in Car after Parking on Road)