कल्याण पूर्वमध्ये एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीला अटक करण्यात आली. विशाल गवळीसह त्याची बायको साक्षी गवळीलाही अटक करण्यात आली. सध्या त्या दोघांचीही पोलीस चौकशी सुरु आहे. आता या पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर सोशल मीडियावरुन त्याची ओळख मिटवल्याचा प्रकार समोर आला आहे.
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिच्या हत्या करण्यात आली. या घटनेनंतर विशाल गवळीने सोशल मीडियावरील सर्वच पोस्ट डिलीट केल्याचे तपासादरम्यान समोर आले. आपली ओळख पटू नये म्हणून त्याने फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवरील फोटो, चॅट्स आणि डीपी हटवला. त्यानंतर त्याने त्याचे इतर डिजीटल ओळखही मिटवली. विशाल गवळीने आपली ओळख पटू नये यासाठी सोशल मीडिया अकाऊंटही डिलीट केले. त्यापूर्वी त्याने त्याच्यावरील पोस्ट डिलीट केल्या.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पूर्वेमधील कोळसेवाडीत राहणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह भिवंडी-कल्याण सीमेवरील गांधारी पुलाजवळील स्मशान संकुलात आढळला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. यानंतर कल्याण पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. या घटनेचा मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली. त्यापूर्वी त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली होती.
कल्याणमध्ये झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही चेक केले. या सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना पीडित मुलगी परिसरातून बाहेरच गेली नसल्याचं स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी आसपासच्या घरांमध्ये शोध घेतला. त्यावेळी एका घराबाहेर ठेवलेल्या बुटांवर रक्ताचे डाग आढळला. ज्या घरासमोर रक्ताळलेले बूट होते, ते घर विशालचं होतं. यानंतर पोलिसांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याची पत्नी साक्षी गवळीला ताब्यात घेतले.
तिने या संपूर्ण घटनेचा उलगडा केला. साक्षीने पोलिसात दिलेल्या जबाबानुसार ती खासगी बँकेतून कामावरुन घरी आली. संध्याकाळी सात वाजता ती घरी आल्यानंतर तिला घडलेला सर्व प्रकार विशालने सांगितला. यानंतर सात वाजता आम्ही दोघेही पती-पत्नी यांनी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे, याबद्दल योजना आखली. त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री साडेआठ वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. यानंतर नऊ वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले आणि मृतदेह फेकून दोघे परतले, असे साक्षीने यावेळी सांगितले. यानंतर साक्षीच्या जबाबानंतर पोलिसांनी विशालचा शोध घेण्यास सुरुवात केली.
यानंतर कल्याण क्राईम ब्राँचला विशाल शेगाव या ठिकाण असलेल्या लॉजवर थांबल्याची माहिती मिळाली होती, याच माहितीच्या आधारे पोलीस तिथे पोहोचले. पण विशाल तिकडे नव्हता. त्यानंतर जवळच्या एका सूलनमध्ये दाढी करायला गेलेल्या विशालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशाल हा लूक बदलून पोलिसांना गुंगारा देण्याच्या तयारीत होता.