कल्याण : रस्त्यावर चालत असताना एसटी बसमधून आवाज आल्यानंतर बस थांबवून जेव्हा (ST Bus Wheel Nut Bolt Missing) बघितलं गेलं, तर बसमधील एका चाकाचे सर्व नटबोल्टच गायब होते. वेळेवर प्रसंग माहिती पडल्याने एक मोठा अपघात टळला आहे. मात्र, यामुळे बसेसची कशाप्रकारे देखरेख केली जाते, या घटनेमुळे समोर आलं आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा निष्काळजी पणा यामुळे उघडकीस आला आहे (ST Bus Wheel Nut Bolt Missing).
कल्याण शिळ रोडवर एक एसटीबस भररस्त्यात थांबली होती. सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी त्या रस्त्यावरुन जात असतांना त्यांची नजर या बसवर पडली. चालक आणि वाहकाला विचारपूस केली असता, माहिती मिळाली की, बसमधील एका टायरचे नटबोल्ट गायब आहेत.
हा प्रकार समजताच बसमधील प्रवाशांना उतरविण्यात आले आणि बस दुरुस्तीसाठी कल्याण बस आगाराला संपर्क करण्यात आला. योगेश दळवी यांनी बसचा व्हिडीओ काढला. नटबोल्ट कसे पडले, हे कोणालाही माहिती नाही. एवढे नक्की की, बस डेपोमधून निघताना बसची चाचणी केली नव्हती. हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु असून शासनाने आणि परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी योगेश दळवी यांनी केली आहे (ST Bus Wheel Nut Bolt Missing).
याबाबत कल्याण बसडेपोचे मनेजर विजय गायकवाड यांचे म्हणणे आहे की, ही बस पनवेल डेपोची होती. कल्याण मुरुड मार्गावर चालणारी आहे. गाडीच्या दुरुस्तीचे काम कल्याण बस डेपोमध्ये सुरु आहे. मात्र, याप्रकरणी त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
…तर वाशीच्या टोलनाक्यावर दुप्पट पैसे भरावे लागणार https://t.co/VVmJfLWRgN #Vashi #TollPlaza #NaviMumbai #FASTag
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021
ST Bus Wheel Nut Bolt Missing
संबंधित बातम्या :
Video : कोल्हापुरात गुरांच्या गोठ्याला भीषण आग, मुकी जनावरं होरपळली, लाखोंचं नुकसान
शेतकऱ्यांनी हायवेवर उभारली स्वत:ची बाजारपेठ
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला