“यंदा मंत्रिपद मिळावे आणि…” उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भाजप आमदाराच्या पत्नीने व्यक्त केली इच्छा

| Updated on: Oct 24, 2024 | 12:52 PM

अतुळ भातखळकर हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सलग तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. अतुल भातखळकर मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

यंदा मंत्रिपद मिळावे आणि... उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भाजप आमदाराच्या पत्नीने व्यक्त केली इच्छा
Follow us on

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कांदिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अतुळ भातखळकर हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सलग तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. अतुल भातखळकर मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मिठाई भरवत विजयासाठी शुभेच्छा

भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अतुल भातखळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कुटुंबासह घरी पूजा केली. अतुल भातखळकर यांच्या पत्नीने त्यांची आरती केली. त्यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला. तसेच त्यांना मिठाई भरवत विजयासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांच्या पत्नीने अतुल भातखळकरांना मंत्रिपद मिळावे, अशी इच्छाही व्यक्त केली.

“अतुल भातखळकरांना मंत्रिपद मिळावे”

“माझी दिवाळी आताच सुरु झाली आहे. ते आमदार नव्हते तेव्हापासून ते मतदारसंघासाठी झटत आहेत. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. मला पक्षाचेही आभार मानावेसे वाटतात कारण त्यांनी तिकीट दिले. मला खूप खूप आनंद आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. यापुढेही त्यांची अशीच प्रगती व्हावी. त्यांना मंत्रिपद मिळावं, अशी मी आशा व्यक्त करते”, अशी प्रतिक्रिया अतुल भातखळकर यांच्या पत्नीने दिली.

शक्तीप्रदर्शन करत दाखल करणार अर्ज

आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अतुल भातखळकर हे कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत स्वयंभू श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. या ठिकाणी अतुल भातखळकर हे पूजा करतील. यानंतर भव्य रॅली काढत मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे सलग तिसऱ्यांदा कांदिवली विधानसभेतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अतुल भातखळकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. अतुल भातखळकरांवर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. अतुल भातखळकर यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार ठाकूर रमेश सिंह यांचा पराभव करून प्रथमच विजय मिळवला होता. त्यानंतर ठाकूर रमेश सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.