औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. मंगळवारपासून कन्नड धुळे महामार्ग दरड कोसळल्यानं बंद आहे. त्यामुळे अनेक वाहनं घाटातच अडकली आहेत. मध्य प्रदेशमधून औरंगाबादकडे म्हशी घेऊन निघालेला टेम्पो दरीत कोसळलाय. वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला असून 7 म्हशीपैकी 6 म्हशी टेम्पोतचं मृत झाल्यात. एक जिवंत म्हैस अजूनही टेम्पोतचं अडकलेली आहे. तिला वाचवण्यासाठी धुळ्यावरून एसडीआरएफची टीम प्रयत्न करत आहे.
कन्नड-धुळे महामार्गावर दरड कोसळल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंदच आहे. मंगळवारपासून (31 ऑगस्ट) या रस्त्यावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे या मार्गावर घाटात अनेक वाहनं अडकून पडलीत.
मध्य प्रदेशमधून औरंगाबादकडे म्हशी घेऊन निघालेला टेम्पो दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. यात वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोत 7 म्हशी होत्या. त्यापैकी 6 म्हशींचा टेम्पोतचं मृत्यू झाला. एक म्हैस जिवंत आहे. तिला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी धुळ्यावरून एसडीआरएफच्या पथकाची तैनाती करण्यात आलीय. कन्नड घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय. कन्नड घाटातील ही दृश्यं बघून काळजाचा ठोका चुकतो आहे.
दरम्यान, मंगळवारी (31 ऑगस्ट) देखील औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली होती. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात फसल्या होत्या. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. अनेक नागरिक घाटात अडकले होते. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू केलं होतं. घाटात अजूनही दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्पच आहे. यामुळे कन्नड तालुक्यातील 10-12 गावांचा संपर्क तुटलाय.
31 ऑगस्टला मुसळधार पावसानंतर भिलदारी पाझर तलाव फुटला. याचा नागद गावाला जबरदस्त फटका बसला. नागद गावातील 30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू झाला. पुराच्या पाण्यात फसून गाई म्हशींचा मृत्यू झाला. नदीच्या काठावरील गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशींचा मृत्यू झाला. भिलदारी धरण फुटल्यामुळे नदीला जोरदार पूर आला होता. यात हे नुकसान झालं.
Kannad Dhule highway closed from 31 August due to land sliding in Aurangabad