पुण्यामध्ये एका तरुणीवर हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा हल्ला तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या तरुणानं केला होता. शुभदा कोदारे असं या तरुणीच नाव आहे. तर कृष्णा कनोजा असं या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून शुभदाने कृष्णाचा विश्वासघात केला होता.
कृष्णाला शुभदाला मारायचे नव्हते पण अद्दल घडवायची होती. विश्वासघाताची आग मनात ठेवत कृष्णाने शुभदावर हल्ला केला. वडील आजारी आहेत असं सांगत शुभदाने वेळोवेळी कृष्णाकडे पैसे मागितले होते. कृष्णाने देखील तिला पैसे दिले, मात्र जेव्हा तिच्या वडिलांना कुठलाही आजार नसल्याचे लक्षात आल्यावर कृष्णाने तिला अद्दल घडवायचे ठरवले, आणि हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीमध्ये कार्यरत होते. शुभदाने वडील आजरी आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे हे सांगून तिने कृष्णा कडून कधी २५ हजार तर कधी ५० हजार असे एकूण ४ लाख रुपये उकळले. एवढ्यावर न थांबता शुभदा त्याला आणखी पैसे मागू लागल्याने त्याचा संशय बळावला
कृष्णा ने थेट शुभादाचे मूळ गाव कराड गाठले. तिच्या घरी जाताच कृष्णाच्या पाया खालची जमीन सरकली. तिचे वडील अगदी ठणठणीत होते. कृष्णाने त्यांना विचारले असता मी आजारी नाही आणि माझ्यावर कुठलीही शस्त्रक्रिया केली गेली नाही आणि होणार नाही असं त्यांनी सांगितलं. सत्य समोर आल्यावर कृष्णाने शुभदाकडे पैसे परत मागण्याचा तगादा लावला. यातून त्यांची अनेकवेळा वादावादी सुद्धा झाली.
कृष्णाने शुभदा हिला अद्दल घडवायची म्हणून तिला कंपनीच्या पार्किंगमध्ये गाठले आणि तिच्या हातावर वार केला. या हल्ल्यात शुभदा हिच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या. या हल्ल्यानंतर तिची शुगर कमी झाली परिणामी तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि यात तिचा मृत्यू झाला.