2019 मध्ये राष्ट्रपती राजवट होती… त्यावेळी मी दररोज का बोलत होतो? संजय राऊत यांनी स्वतःच सांगून टाकलं, काय होतं कारण?

| Updated on: Apr 07, 2023 | 3:00 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 2019 च्या निवडणुकीमध्ये दररोज का बोलत होतो याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. याशिवाय भाजपला एक खुलं आव्हान देखील दिलं आहे.

2019 मध्ये राष्ट्रपती राजवट होती... त्यावेळी मी दररोज का बोलत होतो? संजय राऊत यांनी स्वतःच सांगून टाकलं, काय होतं कारण?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

कर्जत : बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकंच स्थान शरद पवार यांचे देखील आहे असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्जत येथील जाहीर मुलाखतीत केले आहे. याशिवाय शरद पवार यांना कधीही काळोखात भेटलो नाही त्यांचे मला अनेकदा मार्गदर्शन आणि आधार लाभला आहे. त्यामुळे 2019 ला निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली होती. त्यानंतर खाली येऊन गाडीत बसलो आणि थेट सिल्वर ओक येथे शरद पवारांची भेट घ्यायला गेलो होतो. तिथे माझ्या मुलाखती घेतल्या त्यावेळी मला विचारलं इथं कशाला आले, मी लपून काहीच ठेवलं नव्हतं. मी सरकार बनवायला आलोय असं जाहीर केलं होतं म्हणत संजय राऊत यांनी कर्जतच्या मुलाखतीत म्हंटलं आहे.

हिंदू हिंदू असं म्हणत रस्त्यावर फिरताय मात्र आमचं हिंदुत्व असं नाही बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व आहे आणि आमच्या हिंदुत्वाचा आधार हे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अखंड हिंदुस्तान करण्याच्या गोष्टी करतात, 24 कोटी मुसलमान आहे. त्यांना संपवून टाका आणि करा अखंड हिंदुस्तान. निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान तणाव निर्माण करतात. तो तणाव कशाला करतात भारत चीन तणाव करा असं खुला आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे.

हे सुद्धा वाचा

भारत देश हा हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. निवडणुका या कागदावर घ्या, असा आम्ही वारंवार सांगतोय मात्र, दुसरीकडे त्यांना मुंबई ला सुद्धा तोडायचे आहे. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही, ही सर्व व्यापारी मंडळी आहे अशी टीका भाजपावर संजय राऊत यांनी केली आहे.

देशामध्ये निवडणुका आला की भारत पाकिस्तानचा मुद्दा समोर येतो. तणाव निर्माण केला जातो. मात्र यापुढे तसं होणार नाही. लोकं सुज्ञ झाली आहे. निवडणुकीची वाट बघत आहे. 2024 ला देशात सत्तांतर झालेले दिसेल असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

2019 च्या दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. असं असताना मी दररोज बोलत होतो. यामागे बूस्टर डोस देण्याची गरज होती. असंही कर्जत येथील जाहीर मुलाखतीत संजय राऊत यांनी सांगत गौप्य स्फोट केला आहे. त्यामुळे राजकारणात आता नवी चर्चा होण्याची शक्यता आहे.