निधीवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची नाराजी पुन्हा उघड, आता पक्षाकडे कुणाचं गाऱ्हाण?

| Updated on: Feb 16, 2022 | 8:00 PM

आता पुन्हा निधीवरून काँग्रेसची खदखद बाहेर आली आहे. काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी यांनी आदिवासी खात्याला मिळणाऱ्या तोकड्या निधीवरून आता नाराजी व्यक्त केली आहे.

निधीवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची नाराजी पुन्हा उघड, आता पक्षाकडे कुणाचं गाऱ्हाण?
के. सी. पाडवी यांची नाराजी बाहेर
Follow us on

नंदुरबार : 105 आमदार असणाऱ्या भाजपला (Bjp) शह देत राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाले. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना राज्यात एकत्र आली. सरकार स्थापनेला आता जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. मात्र महाविकास आघाडील अंतर्गत नाराजी अजूनही संपलेली नाहीये. वेळोवेळी निधीवरून तर कधी महामंडळाच्या वाटपावरून नाराजी बाहेर आली आहे. काही वेळेला महाविकास आघाडीतल कार्यकर्तेही आमनेसामने आल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसचा सूर आधीपासून थोडासा नाराजीचा आहे. ते अनेकदा दिसूनही आलं आहे. आता पुन्हा निधीवरून काँग्रेसची खदखद बाहेर आली आहे. काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी यांनी आदिवासी खात्याला मिळणाऱ्या तोकड्या निधीवरून आता नाराजी व्यक्त केली आहे. यादर्भात ते काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना बोलणार असल्याची माहितीही समोर आली आहे. महाविकास आघाडीत एकमत नसल्याची टीका भाजपकडून अनेकदा होत आली आहे. दुसरीकडे भाजप महाविकास आघाडी सरकार जाईल यासाठी रोज नव्या तारखा देत आहे. असा वेळी काँग्रेसची ही खदखद महाविकास आघाडीची चिंता वाढवणारी आहे.

पाडवींची नेमकी कशावरून नाराजी

आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी पाडवी यांची खात्याला मिळत असलेल्या कमी निधीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आणखी एका काँग्रेस मंत्र्यांच्या गाऱ्हाणाने महाविकास आघाडीतील दुफळी बाहेर आली आहे. के. सी. पाडवी यांच्या सागंण्यानुसार इतर विभागांना आस्थापना खर्च हा जनरल बजेट मधून मिळतो. तर आदिवासी विकास विभागाला मात्र विकासाच्या निधींमधून हा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे आदिवासी विभागावर आर्थिक ताण पडत आहे. आदिवासी बांधवांचा विकास थांबवून पगार द्यावा लागत आहे, असेही पाडवी म्हणाले आहेत. एकीकडे आस्थापना खर्च वाढतच आहे, तर दुसरीकडे निधी नाही, त्यामुळे आदिवासी खाते फक्त पगार वाटप करणार खाते म्हणून शिल्लक उरेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

अनेकदा मतभेद चव्हाट्यावर

के. सी पाडवी यांनी ही नाराजी व्यक्त करताना, मला माझ्या सरकार विरोधात बोलायचे नाही. पण आदिवासी बांधवाच्या विकासाशी निगडीत प्रश्न असल्याने याचा खुलासा करत आहे, असेही सांगितले आहे. गेल्यो दोन-अडीच वर्षात महाविकास आघाडीत अनेक प्रश्नांवर दुमत असल्याचे दिसून आले आहे. कधी शहरांची नावं बदलण्याला काँग्रेसने विरोध केला आहे. तर काँग्रेसच्या काही आंदोलनाला इतर पक्षांचं समर्थन मिळालेलं नाही. काल-परवाच झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या घरावरील काँग्रेसच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा विरोधाचा सुरू दिसून आला आहे. तर कधी शिवसेनेला यूपीएत घेण्यावरून अनेकदा मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातही अनेकदा वाकयुद्ध रंगताना दिसून आले. आणि आता के. सी. पाडवींच्या नाराजीने पुन्हा एकदा हीच जुनी जखम ताजी झाली आहे.

बॉय का? मिलिंद नार्वेकरांनी उत्तर देताना थेट नारायण राणेंच्या मेमरीची घंटी वाजवली !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्षांनी निवड होणार का? मलिकांनी काय सांगितलं?

Sanjay Raut Vs Bjp : राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे, तर राऊतही म्हणाले होय मी राष्ट्रवादी !