‘धर्मवीर-2’ सिनेमा पाहू नका… या सिनेमात फक्त… आनंद दिघे यांच्या कुटुंबातीलच व्यक्तीचं थेट आवाहन काय?

| Updated on: Sep 28, 2024 | 12:22 PM

धर्मवीर-2 हा आनंद दिघे यांच्या जीवनावरील सिनेमा आला आहे. विधानसभा निवडणूक जवळ आलेली असतानाच हा सिनेमा आल्याने या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा सिनेमा केवळ गद्दारी पचवण्यासाठीच असल्याची टीका आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी केली आहे. तसेच हा सिनेमा न पाहण्याचं आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

धर्मवीर-2 सिनेमा पाहू नका... या सिनेमात फक्त... आनंद दिघे यांच्या कुटुंबातीलच व्यक्तीचं थेट आवाहन काय?
'धर्मवीर-2' सिनेमा पाहू नका, कोणी केलं आवाहन ?
Image Credit source: social media
Follow us on

धर्मवीरच्या यशानंतर आता धर्मवीर-2 हा सिनेमा आला आहे. या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा सिनेमा आल्याने या सिनेमाची चर्चा होत असतानाच त्यावर टीकाही होत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हा सिनेमा अत्यंत बकवास आणि बोगस असल्याचं म्हटलं आहे. या सिनेमातील सर्व गोष्टी काल्पनिक असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. आता तर थेट आनंद दिघे यांच्या कुटुंबातील व्यक्तीने म्हणजे दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनीच या सिनेमावर टीका केली आहे. केदार दिघे नुसतेच टीका करून थांबले नाहीत तर त्यांनी हा सिनेमा पाहू नका, असं आवाहनच शिवसैनिकांना केलं आहे.

केदार दिघे यांनी ट्विट करून या सिनेमावर जोरदार हल्ला चढवला आहे. स्वर्गीय दिघे साहेबांच्या आडून एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला चॅलेंज करत आहेत. त्यासाठीच धर्मवीर-2 हा चित्रपट काढला गेला आहे असे वाटते. धर्मवीरांच्या जीवनापेक्षा गद्दारी पचवण्यासाठी खोट्या गोष्टी यात आहेत. या चित्रपटाचे नाव गद्दारी नंबर 1 असायला हवं होतं!, असा हल्ला केदार दिघे यांनी चढवला आहे.

हे सुद्धा वाचा

आमच्याही स्वप्नात दिघे साहेब येतात…

एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नात दिघे साहेब येतात, असं काल्पनिक चित्र रंगून स्वतःच्या फायद्यासाठी धर्मवीर 2 चित्रपट काढला गेला. दिघे साहेब स्वप्नात येऊन शिवसेना पक्ष चोर असं कधीच सांगणार नाहीत. या चित्रपटात दिघे साहेबांच्या प्रतिमेचा गैरवापर शिंदेनी केला आहे. ठाणेकर त्यांना माफ करणार नाहीत, असं सांगतानाच जेव्हापासून यांनी गद्दारी केली आहे, तेव्हापासून दिघे साहेब आमच्या स्वप्नात येऊन सांगतात… शिंदे गटाला ठाण्यातून नेस्तनाबूत करा…आमच्याकडे धनसंपत्तीची कमतरता आहे. परंतु ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिक सोबत आहेत!, असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे.

हेच तुमचं हिंदुत्व?

धर्मवीर 2 मध्ये शिंदे म्हणतात अडीच वर्षांपूर्वी मविआत जाऊन मी चुकलो होतो आणि आता मी योग्य मार्गावर आहे. मग आता योग्य मार्गावर चालताना अजित पवारांना मंत्रिमंडळात अर्थमंत्री केलेलं चालतं? हे हिंदुत्व आहे?, असा सवाल दिघे यांनी केला आहे. दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून मी तमाम शिवसैनिक आणि जनतेला आवाहन करतो की, हा चित्रपट पाहू नये. या दिघे साहेबांच्या जीवनावर काहीही नसून फक्त एकनाथ शिंदे यांची गद्दारी कशी योग्य हे दाखवण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

किती खालच्या थराला जाल ?

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार. मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहीत असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?, असा सवालही त्यांनी केला आहे.