ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) आजच ठाणे कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिला ताब्यात घेण्यासाठी आता गोरेगाव पोलीस आणि पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. सुरूवातील केतकी चितळेला नवी मुंबईतील कळंबोली पोलिसांनी (Navi Mumbai Police) ताब्यात घेतलं. त्यानंतर तो गुन्हा हा गुन्हे शाखेकडे वर्ग करून तिला ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून ठाण्यात घेऊन जाताना केतकी चितळेला बाहेर काढण्यात आलं. यावेळी केतकी चितळेवर अंडी फेकण्या आली. शाई फेकण्यात आली. तिच्यावर हल्लाही झाला. मात्र तरीही केतकी चितळे ही स्माईल करताना दिसून आली. पोलिसांनी मोठ्या गडबडीने तिला उचलून गाडीत घेडतलं. मात्र गाडीतही केतकी हसतानाच दिसून आली.
कोर्टात आतापर्यंत केतकीला दोनवेळा हजर करण्यात आलं. त्यात पहिल्या वेळी तर केतकीने तिची बाजू खुद्द मांडली आणि तिची बाजू वकिलांनी मांडली. मात्र दोन्ही वेळी केतकी हसतानाच दिसून आली. पोलीस कोठडी आणि जेल या अशा गोष्टी आहेत जिथे भल्या भल्यांचं हस्य गायब होतं. त्यामुळे अनेकजण कोर्टाची आणि जेलची पायरी चढायाला लागू नये हीच प्रार्थना करतात. पोलिसांच्या खाक्यालाही अनेकजण दबकून असतात. मात्र पोलिसांच्या ताब्यात असताना अडीफेक आणि शाईफेक, त्यातच हल्ला झाला असताना एवढ्या धक्काबुक्कीतही केतकी हसताना दिसून येत आहे. त्यामुळे केतकीच्या या स्मित हस्यामागचे रहस्य काय असा सवाल सहाजिकच उपस्थित होत आहे.
आता पोलीसांच्या ताब्यात असताना जरी केतकी चितळे हसताना दिसत असली तरी तिचं हे हास्य आणखी किती टिकेल याबाबत शंका आहे. कारण केतकीविरोधात फक्त ठाण्यातच नाही तर अनेक ठिकाणी केसेस दाखल झाल्या आहेत. त्यात गोरेगाव, नाशिक, पुणे, धुळे, उस्मानाबाद, अशा विविध ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे आता ठाणे कोर्टाने जरी केतकीला न्यायालयीन कोठडी देत तिच्या जामीनासाठी अर्ज करण्याचा मोकळा केला असला तरी इतर ठिकाणचे पोलीस तिला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्यांना केतकीचा ताबा मिळाल्यास पुन्हा तिच्या अडचणी वाढू शकतात. पुन्हा तिचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढू शकतो. त्यामुळे केतकीची ही स्माईल किती टिकेल याबाबत जरा शंकाच आहे. आता हे प्रकरण कुठपर्यंत जातं? हे येणारे काही दिवस सांगतीलच.