गावाच्या शिवावर लिंबू, बाहुल्या आणि… धाराशिवमधील त्या प्रकाराने गावकरी भेदरले, शेतात जायलाही टरकली; काय घडलं?

| Updated on: Dec 17, 2024 | 12:05 PM

धाराशिव तालुक्यातील खेड गावात गेल्या पंधरा दिवसांपासून अज्ञात व्यक्तींनी लिंबू, मिरची, बाहुल्या आणि गव्हापासून बनवलेले पुतळे रस्त्यावर टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांना माहिती दिली असतानाही कारवाई न झाल्याने गावकरी चिंताग्रस्त आहेत आणि तपासाची मागणी करत आहेत.

गावाच्या शिवावर लिंबू, बाहुल्या आणि... धाराशिवमधील त्या प्रकाराने गावकरी भेदरले, शेतात जायलाही टरकली; काय घडलं?
धाराशिवमधील त्या प्रकाराने गावकरी भेदरले, शेतात जायलाही टरकली
Follow us on

जालन्यातील गोंदी येथील शाळेत एक भयानक प्रकार घडल्याचे समोर आले . येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्यासारखे कृत्य केल्याची घटना उघड झाल्याने खळबळ माजली होती. हा प्रकार ताजा असतानाच आता धाराशिवच्या खेडमधील शिव रस्त्यावरही करणी भानामतीचा भानामतीचा प्रकार निदर्शनास आल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  खेड गावच्या शिवावर खिळे टोचलेल्या भावल्या लिंबू व गव्हापासून बनवलेल्या महिलेची प्रतिकात्मक पुतळा टाकण्याचे प्रकार समोर आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकाराची पोलिसांना कल्पना देऊनही कोणीच न फिरकल्याने गावकरी त्रासले आहेत. हे नेमंक कोण करत आहे, याचा लवकरात लवकर तपास व्हावा अशी मागणी करण्यात आहे. मात्र टीव्ही9 ह्या गोष्टीची पुष्टी करत नाही.

काय घडलं नेमकं ?

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील खेड गावात करनी भानामतीची दहशत पसरली आहे. खेड येथील शिव रस्त्यावर करणी भानामतीचा प्रकार निदर्शनास आल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून अज्ञात व्यक्ती लिंबू मिरची बाहुल्या आणि गव्हापासुन बनवलेल्या महिलेचा प्रतिकात्मक पुतळा रस्त्यावर आणून टाकत असल्याची घटना समोर आली आहे. नरबळी सारख्या प्रकारातुन घाबरवण्यासाठी हा प्रकार कोणीतरी करत असल्याच गावकऱ्यांचं म्हणणं आहे. घडलेल्या प्रकाराची पोलीस प्रशासनाला कल्पना देऊनही कोणीच फिरकले नसल्याची गावकऱ्यांची तक्रार असून नेमकं कोण हे करत आहे याचा तपास करावा अशी मागणी खेड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलीय.

गावकरी भयभीत

करणी भानामतीचा काही अंदाज आहे. कणकेचे गोळे,लिंबं, बिबं, सुया असं तिथे टाकलेलं आहे. ते जनावरांनी खाल्ल्यामुळे जनावारांनाही बाधा झाली. त्यांचं पोट फुगलं, चारा खाईनात, त्यांना दवाखान्यात दाखवून आणलं पण काही फरक नाही , उपचारांनी काहीच झालं नाही. अजूनही जनावर चारा खात नाहीयेत, पाणीही पित नाहीयेत. दोन-चार वेळा अशा घटना घडल्या आहेत, असं एका गावकऱ्याने सांगितलं.

आमच्या गावात आणि शिवावरती गेले 15 दिवस झाले हा प्रकार सुरू आहे. हा एक अंधश्रद्धेचा भाग असून त्यातून कोणाचा तरी नरबळी घेण्याचा प्रकार दिसतोय असा आरोप दुसऱ्या गावकऱ्याने केला. त्यामुळे आमच्या गावातील महिलांमध्येही खूप भीतीचं वातावर आहे, संध्याकाळी प्रवास करणंही महिलांसाठी अवघड झालंय, प्रवास करायला नकार देताहेत त्या सगळ्या. या सगळ्या गोष्टीची गावातील नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे, अस दुसऱ्या गावकऱ्याने सांगितले.

याप्रकरणी पोलिसांना माहित दिली असली तरी अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने गावकरी हवालदिल झाले असून या प्रकाराचा लवकरात लवकर तपास लावावा अशी मागणी देखील केली जात आहे.