मुंबई : राज्यात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील हल्ल्याने आणि राणा (Navneet Rana) दाम्पत्याला झालेल्या अटकेने राज्याच्या राजाकरणाचा पारा उन्हाच्या पाऱ्यापेक्षाही जास्त वाढवला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनीही (Mumbai Police) कारवाईला वेग आणला आहे, या हल्ल्यावेळी पोलीस हतबल राहिल्याची टीका करण्यात येत आहे. तसेच या हल्ल्यालो पोलिसांचं समर्थन असल्याची शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे. अशातच आता पोलीसही चांगतलेच कामाला लागले आहेत. राणा दाम्पत्य यांना खार पोलिसांत भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या गेले असताना पोलीस ठाण्यातून बाहेर निघत असताना जमलेले शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यात अज्ञात व्यक्तींकडून सोमय्या यांच्या इनोव्हा गाडीवर दगडफेक केल्यामुळे ते जखमी झाले होते. त्याबाबत सोमय्या यांनी बांद्रा पोलिसांत धाव घेतली. मात्र त्या ठिकाणी देखील चुकीचा FIR पोलिसांनी घेतला, असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
मात्र या प्रकरणी त्यांची फोडलेली गाडी खार पोलिसांनी तपासासाठी आणली आहे. पोलीस ठाण्याबाहेर सद्या ही गाडी उभी केली आहे. तसेच राणा दाम्पत्य यांच्या घराकडे मोठ्या संख्येने शिवसेनीक जमून राडा केला होता .पोलिसांनी लावलेल्या बँरिकेट ढकलून घराकडे धाव घेतली होती . त्यामुळे कायदा सुववस्था निर्माण झाल्यामुळे 10 ते 12 शिवसैनिकांना अटक करून टेबल जामीनची प्रक्रिया खार पोलिस ठाण्यात सुरू आहे. तर दुसरीकडे खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्य यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहेत त्याबाबत आरोपींचे वकील रीजवाण मर्चंट हेही देखील खार पोलिस ठाण्यात आले होते, मात्र माध्यमांशी बोलण्यास टाळले.
तसेच राणा दाम्पत्य याची रवानगी तळोजा आणि अथर्व रोड कारागृहात करण्यात आलेली आहे. राज्यात यावरून दोन्ही बाजुने जोरदार राडा सुरू आहे. भाजपने पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहे. तर आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. तसेच हनुमान चालीसा वाचण्यावरूनही शिवसेनेला भाजपने जोरदार टोलेबाजी केली आहे. आता राणा दाम्पत्यावर पुढील कारवाई काय होते, आणि याच प्रकरणात शिवसैनिकांच्याही अडचणी काही वाढणार का, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फसवलं आहे, आमच्यावर खोटे गुन्हा दाखल केले आहेत, असा आरोप आता राणा दाम्पत्याकडून करण्यात येत आहे.
Nilesh Rane : रस्त्यावर सुरू केलेली लढाई आम्हीही रस्त्यावर संपवू, निलेश राणे यांचा आघाडीला इशारा