100 वाहनांचा ताफा, 10 तास प्रवास, कसा आहे Kirit Somaiya यांचा दौरा जाणून घ्या एका क्लिकवर

| Updated on: Mar 26, 2022 | 8:46 AM

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा चलो दापोली दौरा सुरू झाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर करवाई व्हावी म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

100 वाहनांचा ताफा, 10 तास प्रवास, कसा आहे Kirit Somaiya यांचा दौरा जाणून घ्या एका क्लिकवर
100 वाहनांचा ताफा, 10 तास प्रवास, कसा आहे Kirit Somaiya यांचा दौरा जाणून घ्या एका क्लिकवर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांचा चलो दापोली (dapoli) दौरा सुरू झाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या रिसॉर्टवर करवाई व्हावी म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळीच मुलुंडच्या नीलम नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. त्यासाठी सोमय्या यांच्यासोबत 100 वाहनांचा ताफा आहे. तब्बल 10 तासांचा प्रवास करून सोमय्या साई रिसॉर्ट येथे पोहोचणार आहेत. सकाळी 7 वाजता सोमय्या नीलम नगरमधून प्रतिकात्मक भला मोठा हातोडा घेऊन निघाले. त्यानंतर साडे आठ वाजता ते ऐरोली पोहोचले. यावेळी त्यांचं भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात स्वागत केलं. थोड्याच वेळात ते पनवेलला पोहोचणार आहेत. सोमय्यांच्या या दौऱ्याचा घेतलेला हा आढावा.

असा आहे दौरा

  1. सोमय्या सकाळी 7 वाजता मुलुंडच्या निलम नगरमधून रवाना झाले. त्यानंतर ते ऐरोलीला पोहोचले.
  2. 8.30 वाजता ते पनवेलला पोहचतील.
  3. 9.20 वाजता पेणला येतील
  4. 10.30 वाजता ते वाकणला जातील.
  5. 11.30 वाजता समोय्यांचा ताफा कोलाडला पोहोचेल.
  6. 12.10 वाजता सोमय्या माणगावला जातील
  7. 1.10 वाजता महाडला येतील
  8. 2.10 वाजता पोलादपूरला जातील
  9. 3.20 वाजता भरणा नाका, खेड येथे सोमय्या येतील
  10. 3.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड येथे पोहोचतील
  11. 4 वाजता पोलीस स्टेशनला भेट देऊन माहिती घेतील
  12. 5 वाजता साई रिसॉर्ट मुरुड येथे पोहोचतील

 

किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है

आज सकाळीच किरीट सोमय्या यांच्या घराखाली 100 ते 150 गाड्यांची रांग लागली होती. यावेळी शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या घोषणा दिल्या. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता.

माध्यमांना मनाई

सोमय्या आज संध्याकाळी साई रिसॉर्टवर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक त्यांना दापोलीतच अडवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अॅलर्ट झाले आहेत. शिवाय साई रिसॉर्ट परिसरात मीडियाला चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

Aurangabad | गुंठेवारी नियमितीकरणासाठी उरले फक्त 5 दिवस, 31 मार्चला मुदत संपणार, 1 एप्रिलपासून खिशाला झळ!

Maharashtra News Live Update : घोटाळेबाज सरकारचा हातात हातोडा घेऊन सत्यानाश करणार -किरीट सोमय्या

Switzerland Family Suicide : पोलिस आल्याचे कळताच स्वित्झर्लंडमध्ये फ्रेंच कुटुंबाची सातव्या मजल्यावरुन उडी