मी रायगडचा जावई, उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांचा हिशोब देणार आणि घेणार-किरीट सोमय्या

| Updated on: Feb 20, 2022 | 3:12 PM

संजय राऊतांनी (Sanjay Raut) पुन्हा शेलक्या शब्दात किरीट सोमय्यांचा (Kirit Soamiya) समचारा घेतला आहे. त्यावरून आता पुन्हा किरीट सोमय्यांनी राऊतांना डिवचले आहे.

मी रायगडचा जावई, उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांचा हिशोब देणार आणि घेणार-किरीट सोमय्या
सोमय्या आणि राऊत वाद वाढला
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झालेलं राजकीय वादंग आज आणखी वाढलं आहे. कारण संजय राऊतांनी (Sanjay Raut) पुन्हा शेलक्या शब्दात किरीट सोमय्यांचा (Kirit Soamiya) समचारा घेतला आहे. त्यावरून आता पुन्हा किरीट सोमय्यांनी राऊतांना डिवचले आहे. मी रायगडचा जावई आहे, एकही शब्द इथे तिथे गेला की आमची चंपी होतेय. आज तर संजय राऊत यांनी तीन ते चार वेळा शिवीगाळ केली. आहो तुम्ही उत्तर द्या ना की सुजित पाटकरशी (Sujit Patankar) तुमच्या घरच्यांचे काय संबंध आहेत ते? असा सवाल पुन्हा किरीट सोमय्यांनी विचारला आहे. राऊतांनी पत्रकारांनी किरीट सोमय्यांनी आज के. चंद्रशेखऱ राव यांच्या भेटी संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, किरीट सोमय्या कोण आहेत, कोण आहेत ते मला माहिती नाही. असे चुX#@ देशात भरपूर आहेत. त्यांच्या संदर्भात शिवसेनेला प्रश्न विचारू नयेत, असं संजय राऊत म्हणाले 2024नंतर असे चुX#@ देशात राहणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर राजकारण लोकशाही आणि पारदर्शक असेल, असं ते म्हणाले.

सोनियांची परवानगी घेतलीत का?

किरीट सोमय्यांनी केसीआर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत बोलताना. केसीआर आज मुंबईत येत आहेत, पण आहो ऊद्धव ठाकरे आधी सोनिया अम्मांची तुम्ही परवानगी घेतली का? आधी ममता येऊन गेल्या, तेव्हा तुम्हाला झापलं होतं, आत्ता पायाखालची जमिन सरकते तर तुम्हाला इतरांची आठवण होतेय. तुमच्या अडचणी वाढू नये म्हणून मी काळजी करतोय, असा खोचक टोला सोमय्यांनी लगावला आहे. तसेच ऊद्या मी पत्रकार परिषद घेणार, माझ्यावरील आरोपांवरील हिशोब देणार आणि हिशोब घेणार, असे आव्हानही सोमय्यांनी पुन्हा दिले आहे. राज्यपाल म्हणाले की विरोधक नसतो, पण या विरोधकांना आत्ता हिशोब द्यावा लागणार, असे सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.

अजून घोटाळे बाहेर काढणार?

तसेच राऊतांनी जशी शिवीगाळ केली तशी आम्ही नाही करू शकत. पण आम्ही एक गोष्ट आहे जी करू शकतो, ती म्हणजे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र बनवू शकतो असा टोला सोमय्यांनी लगावला आहे. तसेच छगन भूजबळ यांच्या घोटाळ्यातून घेतलेल्या संपत्तीची पाहणी केली म्हणून आत्ता समन्स पाठवलं. अशा घोटाळेबाजांना हा किरीट सोमय्या सोडणार नाही, कितीही कारवाई केली तरी आमचा लढा सुरूच राहील, असेही सोमय्यांनी महाविकास आघाडीला ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढणार असेच दिसत आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ आणि उद्धव ठाकरे यांच्यात चाय पे चर्चा; तिसऱ्या आघाडीचा शड्डू!

Video | शरद पवार पुढे, अजित पवार मागे, लोकांचे कागद गोळा करताना व्हिडीओ व्हायरल, नेमकं घडलं काय?

तेलंगणाचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ उद्धव ठाकरेंच्या भेटीला; तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला जोर!