मुंबई : माजी मंत्री रामदास कदम (Ramda Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष करत नुकतीच त्यांच्यावर जहरी टीका केली होती, त्यात कदम यांनी एक सल्लाही अजित पवार (Ajit Pawar) यांना दिला होता. त्यात त्यांनी म्हंटले होते की, अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पद द्यावे असं म्हणत कदम यांनी ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला होता. यालाच प्रत्युत्तर देतांना किशोरी पेडणेकर यांनीही रामदास कदम यांना सिरीयसली घेण्यात अर्थ नाही असं म्हणत ठाकरे यांच्यावर बोलले की प्रसिद्धी मिळते, त्यामुळे काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवायची पण त्यांचा प्रयत्न असाही आहे की, 12 आमदारांच्या यादीत त्यांचे नाव यावे पण त्यांचे नाव तेरावे आहे असं म्हणत पेडणेकर यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी आमदारकीचा मुद्दा काढून एकप्रकारे कदम यांना डिवचन्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम हे सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या जवळ आहेत, त्यात ते उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे समर्थक असलेल्या नेत्यावर तिखट प्रतिक्रिया देत आहे.
राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यावर ठाकरे घरण्यावर आणि थेट मातोश्रीवर थेट हल्लाबोल करणारे पहिले नेते हे रामदास कदम होते.
शिंदे गटाच्या माध्यमातून त्यांना आमदारकी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा देखील आहे, त्यावरच पेडणेकर यांनी बोट ठेवत कदम यांना डिवचले आहे.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर प्रतिक्रिया देतांना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत अजित पवार यांनी राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पद द्यावे असा सल्ला दिला होता.
याच सल्ल्यावरून आणि कदम यांनी ठाकरे यांच्यावर केलेल्या हल्ल्यावर किशोरी पेडणेकर यांनी कदम यांना सिरियसली घेऊ नका म्हणत त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे.