रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हाव्यात?; किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

| Updated on: Sep 18, 2024 | 12:13 PM

महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाची नेहमीच चर्चा होत असते. माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी यासंदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हाव्यात?; किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवरच आल्या असून त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही कंबर कसून ततयारी सुरू केली आहे. महायुतूी सरकार आणि महाविका आघाडी दोघांनीही निवडणुकीसाठीजय्यत सुरू केली असली तरी सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. दोघांनीही अजून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेला नसून त्यावरून अनेक चर्चा सुरू आहेत,अंदाज बांधले जात आहेत. मविआनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्याबाबत काहीच उत्तर न दिल्याने मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे अजूनही अस्पष्ट आहे.

दरम्यान महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाची नेहमीच चर्चा होत असते. याच मुद्यावरून माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. त्या नागपूरमध्ये बोलत होत्या.

हा प्रश्नच चुकीचा

राज्याला पहिल्या मुख्यमंत्री मिळणार का असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. ‘ मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेला नाही. त्या, त्यांच्या पतीच्या सोबत असतात , याचा अर्थ त्या राजकारणात आहेत असा नाही. राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाला पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनींचं नावं येता कामा नये’ असं पेडणेकर म्हणाल्या.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी माजी मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांचं नाव मु्ख्यमंत्रिपदाच्या संभाव्य दावेदार म्हणून घेतलं. त्यावरून पेडणेकर यांनी गायकवाड यांना सुनावलं.

काय म्हणाल्या होत्या वर्षा गायकवाड ?

पुरोगामी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळाली, तर मला खूप आनंद होईल. महाराष्ट्र महिलांना संधी देणारं राज्य आहे. महिलांना प्रतिनिधित्व देणारं आरक्षण बिलही महाराष्ट्रानेच पहिल्यांदा मंजूर केलं होतं. त्यामुळे निवडणुकीनंतर महिला मुख्यमंत्री झालेलं पाहायला नक्कीच आवडेल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.