आजरा तालूक्यातील गवसे नजीक हेब्बाळकराच्या शेता नजीक टस्कर हत्तीने काल रात्री 10 वाजता रस्त्यावर थांबून चक्क रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सुमारे दोन तास वाहतूक ठप्प होती. गेल्या पंधरवड्यात पेद्रेवाडी, हाजगोळी भागात या हत्तीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. सोमवारी तो आजऱ्याच्या पश्चिम भागात परतत होता. रात्रीच्या वेळिस हेब्बाळकरांच्या शेतातून तो 10 वाजता तो रस्त्यावरच थांबला होता. आजरा-आंबोली या मार्गावर नेहमी वर्दळ असते. कोकणात आणि गोव्याला जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. सध्या पावसाळा सुरु असल्याने आंबोलीला जाण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते, त्यातच आजरा परिसरात टस्कर आल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापूरातील आजरा परिसरात हत्ती; आजरा-आंबोली रोड रोखून धरला#kolhapur #Ajara #forest #amboli #maharashtra pic.twitter.com/1paxTJdheh
— Mahadev Parvti Ramchandra (@mahadevpr) July 15, 2022
वाहनांच्या वर्दळीमुळे तो सुमारे 2 तास रस्त्यावरच थांबला. हत्ती रस्त्याकडेला थांबल्याने वाहनधारकांनी आपली वाहने दोन्हीही बाजूस थांबवली. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प होती. वाहनांच्या आवाजाने हा टस्कर पुन्हा परत जंगलाच्या दिशेने परत फिरला आहे.
या हत्तीमुळे गेल्या काही दिवसांपासून आजरा भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसा झाले होते. गेल्या पंधरा दिवसापूर्वी कासार कांडगाव येथील घराजवळ लावलेल्या कारचे हत्तीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
सध्या आजरा भागात भात रोप लागवड चालू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते असल्याने वन खात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. आजरा-आंबोली जाणाऱ्या मार्गावर अनेक हत्तीचे दर्शन लोकांना झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.