कोल्हापूरः आमदार चंद्रकांत जाधव यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला आणि कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक (Kolhapur North By Election) अवघ्या दोन वर्षात पुन्हा लागली. त्यानंतर चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी मिळाली आणि त्या जागेवर काँग्रेसने विजयही मिळवला. जयश्री जाधव या जवळपास 19 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. जयश्री जाधव (Jayshri Jadhav) यांना या निवडणुकीत 96 हजार 223 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम (Satyjit Kadam) यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार फिल्डिंग लावली होती त्यामुळे हा विजय खेचून आणता आला.
जयश्री जाधव यांना हा विजय मिळवता आला असला तरी उमेदवारी जाहीर होताच शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रारंभी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची नाराजी दूर केली गेली असली तरी निकालानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल असंही बोललं जात होते. कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेनेने कायमच वर्चस्व राखले आहे. मात्र 2019 मध्ये यामध्ये बदल होऊन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव या मतदारसंघातून विजयी झाले, आणि राजेश क्षीरसागर यांना पराभव स्वीकारावा लागला.
या आधीही क्षीरसागर दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळेच जाधव यांच्या निधनानंतर जाहीर झालेली पोटनिवडणूक लढवण्यास क्षीरसागर उत्सुक होते. मात्र आघाडीचा धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मतदारसंघावर दावा केला नाही. त्यामुळे इतर पक्षांनीही उमेदवार दिला नाही. जयश्री जाधव यांच्यासाठी सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी तर पायाला भिंगरी लावून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी बहुतांशी कार्यकर्त्यांना सूचाना देण्यात आल्या.
काँग्रेसचे दिवंगत आमदार जयश्री जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मात्र हक्काचा मतदारसंघ काँग्रेसला दिल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती, त्यानंतर राजेश क्षीरसागर नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. त्या प्रकारानंतर क्षीरसागर मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सर्वशक्तिनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरा आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून आणा असा आदेश मातोश्रीवरून शिवसैनिकांना देण्यात आला होता. त्यामुळे सगळेच शिवसैनिक निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले होते.
जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच एकाच सवाल अनेकांना सतावत होता. तो म्हणजे कडवे शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का? राजेश क्षीरसागर यांचं प्राबल्य असलेल्या भागांमध्ये शिवसैनिक काय करणार, त्यांची मतं भाजपला जाणार का अस एक ना अनेक सवाल राजकीय पटलावर उपस्थित केले गेले. सिद्धार्थ नगर, खोलखंडोबा, बुधवार तालीम, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान, शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महाराणा प्रताप चौक, महानगरपालिका परिसरात राजेश क्षीरसागर यांचाच प्रभाव आहे. त्यामुळे या ठिकाणी जयश्री जाधव यांना आघाडी मिळाल्याचं आकडेवारी सांगते.
सिद्धार्थनगर, पंचगंगा तालीम, खेल खंडोबा परिसरातून जयश्री जाधव यांना 3 हजार 788 मतं मिळाली. तर सत्यजीत कदम यांना 2 हजार 56 मतं मिळाली. अकबर मोहल्ला, टाऊन हॉल, बुरुड गल्ली, शुक्रवार पेठ, तोरसकर चौक भागातून जाधव यांना 3 हजार 756 इतकं मतदान झालं. तर कदमांना 2 हजार 669 मतं मिळाली. अशा प्रकारे मतं मिळाली आहेत.
संबंधित बातम्या