कोल्हापूर : उत्तर कोल्हापूरच्या निवडणुकीने (Kolhapur by Election Result ) आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलं आहे. येत्या काही तासतच या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. कोल्हापुरात सध्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पहिल्या कलांमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (jayshree jadhav) यांचं पारडं जड असल्याचं पहायला मिळतंय. कसबा-वावडातले पहिले कल हाती आले आहेत. या ठिकाणी जयश्री जाधव यांनी चांगली आघाडी घेतली आहे. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुरूवातीला याच मतदारसंघात शिवसेनेची नाराजी उघड दिसून आली होती. शिवसेना नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Khirsagar) हे काही दिवस नॉट रिचेबल असल्याचेही दिसून आले होते. मात्र या निवडणुकीत शिवसेनेकडून पूर्ण सहकार्य मिळालं असल्याची प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी दिली आहे. तसेच चंद्रकांत आणांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असे म्हणत त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या विकासाचा प्लॅनही सांगितला आहे.
सर्वांनी माझ्यासाठी प्रयत्न केले आहे. आण्णांवरील प्रेमाचा हा विजय आहे. मला चांगलं लीड मिळेल असं वाटतं. पंवीस हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडूण येईल, हा विश्वास आहे. प्रत्येकजण म्हणेल माझा विजय मात्र महाविकास आघाडीची वज्रमूठ विजयी ठरले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आहे. आरोप प्रत्यारोप होत राहतील. मात्र कोल्हापूरचा विकास व्हावा हीच इच्छा आहे. चंद्रकांत जाधव साहेबांनी तसे नियोजन केले होते, तसे आराखडे तयार केले होते, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी जयश्री जाधव यांनी दिली आहे.
कोल्हापूराने पोटनिवडणुकीच्यानिमित्ताने मात्र राजकीय आखाड्यांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी सुरुवात केली. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची ही पोटनिवडणूक दोन्ही पाटील आणि दोघंही आजी-माजी पालकमंत्री असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली. सतेज पाटील पुन्हा उत्तर कोल्हापूर काबीज करण्यासाठी पूर्ण जोर लावत आहेत. तर चंद्रकांत पाटलांनी याठिकाणी ठाण मांडत कोल्हापूर उत्तरसाठी पूर्ण ताकद लावली आहे. या निवडणुकीत अगदी ईडीचा उल्लेख चंद्रकांत पाटील प्रचारात करताना दिसून आले होते.
Kolhapur Election Result 2022 : काही तासात निकाल हाती, उत्तर कोल्हापुरात “पंजा कसणार की कमळ” फुलणार?
Kolhapur Election Result 2022 LIVE : पाचव्या फेरीत भाजपने चित्रं पालटलं, कुणाला किती लीड?