पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरातील तपोवन मैदानावर जाहीर सभा होत आहे. तपोवन मैदानावर सभेची तयारी पूर्ण झाली आहे. पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी येणार आहेत. दहा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये येणार आहे. या सभेआधी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. देशाची प्रगती पाहिली आणि देश महासत्तेकडे चालला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणे म्हणजे देशाला महासत्तेकडे नेण्यासारखा आहे, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.
2 जुलै 2023 ला आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि पाच तारखेला आमचा मेळावा झाला. या मेळाव्यात स्वतः अजित दादांनी या सगळ्या गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे यांनी व्हीडिओ दाखवतो म्हणाले असतील तर निश्चितपणे त्यांच्याकडे पुरावे असतील. या गोष्टी अनेक वेळा झाल्या होत्या हे सत्य आहे. धनंजय मुंडे यांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये तथ्य आहे आणि याचा उहापोह या अगोदर अनेकदा झाला आहे, असं मुश्रीफ म्हणालेत.
शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभा करून महाविकास आघाडीने अपमान केला अशा पद्धतीची टीका हसन मुश्रीफ यांनी केली. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूरच्या सभेवर टीका केल्यानंतर त्याला असं मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीला शाहू महाराजांचा सन्मान राखायचा होता तर राज्यसभा का दिली नाही? असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे. शिवाय मान गादीला आणि मत मोदीला असं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा होत आहे. या सभेला महायुतीच्या सर्व मित्र पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत. दहा वर्षांनंतर नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा होत आहे. या सभेत मोदी काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. या सभेच्या आधी हसन मुश्रीफ यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.