Kolhapur rain : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीसाठी रस्ते वाहतूकही कोलमडली आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यापाठोपाठ कोल्हापूरालाही पुराचाही फटका बसला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. तर राधानगरी धरणाच्या दरवाजे उघण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्यानंतर आता नदीकाठच्या गावांना फटका बसला आहे. कोल्हापुरातील आंबेवाडीतून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक सेवा बंद झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचा फटका आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावांना बसला आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे. राधानगरी धरणाचा क्रमांक 6 चा दरवाजा स्वयंचलित उघडला आहे. त्यामुळे राधानगरी धरणातून प्रति सेकंद 2928 इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. राधानगरी धरणातील विसर्ग सुरु झाल्याने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री आणि आजही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सुरु असलेला गडचिरोली चंद्रपूर मार्ग मूल (अजयपुर)पासून बंद करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील ५ मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर चार जिल्हा रस्ते बंद करण्यात आले आहेत. गडचिरोली चंद्रपूर नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग पूलही बंद करण्यात आला आहे. तसेच गडचिरोली आरमोरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आरमोरी पासून बंद करण्यात आला आहे.
त्यासोबतच गडचिरोली चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग चामोर्शी शिवनी नदीपासून बंद करण्यात आला आहे. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग पेरमिली कडकेली पर्लाकोटा या तीन ठिकाणाहून बंद करण्यात आला आहे. गडचिरोलीत अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गडचिरोलीत पाऊस सुरु असल्याने पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्याचा नागपूर विदर्भाशी संपर्क तुटला आहे.
तसेच साताऱ्यातील कन्हेर धरणातून वेण्णा नदी पात्रात 5 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वेण्णा नदी लगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कन्हेर धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे धरण प्रशासनाने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सध्या कन्हेर धरणातून 12 वाजण्याच्या सुमारास चारही वक्र दरवाजातून 5 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
त्यासोबतच सांगलीची स्मशान भूमीत पुराचे पाणी शिरले आहे. अमरधाम स्मशान भूमीत कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे आजपासून अमरधाम स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे. तसेच सांगलीत दुष्काळग्रस्त परिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सज्ज असल्याचे दिसत आहे. तर दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी सिंचन योजना सुरु करण्यात आली आहे.