कोल्हापूरः कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र माळी जोतिबा यात्रेच्या (Jotiba Yatra) काळात जोतिबा डोंगरावर सेवा बजावत होते. त्यावेळी सासनकाठ्यांचेही आगमन झाले, सासनकाठ्या डोंगरावर आल्यानंतर सासनकाठी नाचवणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल (Police Video Viral) झाला. तो इतका व्हायरल झाला की, त्या पोलिसांने हलगीच्या ठेक्यावर सगळ्यानाच ठेका धरायला लावला. त्या दरम्यानचा पोलीस सासनकाठी नाचवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आणि बघता बघता सासनकाठी नाचवणारा पोलीस प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसू लागला.
जोतिबाच्या डोंगरावर हलगीच्या कडकडाटात सासनकाठी नाचवणारा पोलीस… pic.twitter.com/FarHLwhaaT
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2022
जोतिबा डोंगरावर सेवा बजावणारे आणि कोल्हापूर मुख्यालयात असणारे रवींद्र माळी यांचे मूळगाव कुरुंदवाड आहे. त्यांच्या घरी सासन काठीची परंपरा त्यांच्या पणजोबा, आजोबांपासून चालत आली आहे. आता ही परंपरा त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊही चालवतात. त्यांच्या गावाघरातून आणलेली ही सासनकाठी जोतिबाच्या डोंगरावर आणली जाते आणि जल्लोषात नाचवली जाते.
ही सासनकाठी नाचवण्यासाठी गावाघरातील माणसं जोतिबाच्या डोंगरावर येतात. या काळात त्या डोंगरावरचा सगळा माहोल भक्तीभावाचा असला तरी सासनकाठी नाचवतानाचा क्षण जोतिबाच्या भक्तांचा जल्लोष असतो. तो क्षण कोणालाही आवरता येत नाही. हलगीचा कडकडाट आणि गुलालाची उधळण त्यात सासनकाठी आणि सासनकाठी नाचवणारे सगळेच न्हाऊन निघतात. हा जोतिबाच्या डोंगरावरचा हा प्रसंग रवींद्र माळी रोखू शकले नाहीत, म्हणूनच पोलिसाच्या वर्दीत असतानाही त्यांनी सासनकाठी अंगाखांद्यावर घेऊन नाचवली आणि सगळ्यांना नाचायलाही लावली.
कोरोना महामारीनंतर दीर्घ कालावधीनंतर सासनकाठी नाचवण्याची अनेकांची इच्छा होती. अशी कालावधीर रवींद्र माळी यांची ड्युटी जोतिबा डोंगरावर लागली आणि आपल्या गावातील सासनकाठी समोरही दिसली. या प्रसंगाबद्दल सांगताना ते म्हणतात की, आमची सासनकाठी दिसल्यावर मला नाचवण्याचा मोह झाला मात्र मी ड्युटीवर आणि वर्दीवर असल्यामुळे धाडस होत नव्हते, पण गावातील मित्र मंडळींनी आग्रह केला म्हणून आमची मानाची सासनकाठी नाचवली. त्यानंतर वर्दीची भीतीही वाटली पण वरिष्ठांनी फोन करुन माझे कौतुक केले त्यानंतर माझं टेन्शन कमी झालं असंही ते सांगतात.
रवींद्र माळी हे पोलीस असले तरी ते मुळात राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक विजेता खेळाडू आहे.महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी सलग तीन वर्षे वेटलिफ्टिंगमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. ते चांगले खेळाडू आणि राष्ट्रीय पातळीवरचा सुवर्ण पदक विजेता असला तरी ते सांगतात की मी वयाच्या बाराव्या वर्षापासून व्यायाम करतो.
संबंधित बातम्या
‘दोन दिवसात लालपरी पूर्वपदावर येईल’ म्हणत अनिल परबांनी मागितली माफी, सदावर्तेंवरही जोरदार हल्लाबोल
साहित्यात तेवला सत्कार्याचा दीप; नांदेडमध्ये मराठी साहित्य संस्कार मंडळाचे संमेलन उत्साहात!