कोल्हापूर : सॅनिटायझरची बाटली पेटल्यामुळे स्फोट होऊन जखमी झालेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सॅनिटायझरमुळे आग लागून गेल्या आठवड्यात 40 वर्षीय महिला होरपळली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बोरवडे भागात हा दुर्दैवी प्रकार घडला होता. त्यामुळे कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी उपयुक्त ठरणारे सॅनिटायझर हाताळताना काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. (Kolhapur Lady succumbs to injury burnt after sanitizer blasts)
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी आपले हात वारंवार धुवावे, सॅनिटायझर वापरावा, असे आवाहन अनेक वेळा केले जाते. मात्र ते वापरताना केलेली हलगर्जी जीवावर बेतू शकते, याचे उदाहरण समोर आले आहे.
मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटायझेशन करताना भडका उडाल्याने नाशिकमधील महिलेचाही जुलै महिन्यात मृत्यू झाला होता. आगीचा भडका उडून 90 टक्के भाजलेल्या महिलेने उपचारादरम्यान चार दिवसांनी प्राण सोडले होते. नाशिक शहरातील वडाळा गावात ही दुर्दैवी घटना घडली होती. (Kolhapur Lady succumbs to injury burnt after sanitizer blasts)
वीज पुरवठा खंडित झाल्याने रजबीया शेख यांनी घरात मेणबत्ती लावली होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी याच वेळी त्या आपले घरही सॅनिटाईझ करत होत्या. त्याचवेळी आगीचा भडका उडाला आणि रजबीया शेख भाजल्याचा दावा केला जात होता. या अपघातात रजबीया 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.
धक्कादायक ! गॅस गिझरने एकाचा गुदमरून मृत्यू, तुम्हीही वापरताय? रहा सावधhttps://t.co/lJRjSwuhuB#gaslands | #YoungBoy | #death
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 2, 2021
संबंधित बातम्या :
मेणबत्तीच्या उजेडात सॅनिटाईझ करताना भडका, नाशकात महिलेचा मृत्यू
(Kolhapur Lady succumbs to injury burnt after sanitizer blasts)