कोल्हापूर : आजच्या धवत्या जगात आपल्याला सगळं कसं इनस्टंट हवं आहे. त्याप्रमाणे आज आपल्या एका क्लीकवर फोटो ही उत्तम हवे असतात. त्यामुळे आजची तरूण पिढी ही चांगले फोटो येण्यासाठी चांगले फोन घेतात. चांगला फोटो (Photo) यावा म्हणून चांगले लोकेशन शोधतात. निसर्गाने आपल्या कॅनव्हासवर (canvas) केलेली उधळण आपल्या कॅमेरॅत कैद करण्यासाठी अनेकांची धडपड असते. अशीच धडपड एका कोल्हापूरच्या पट्ट्याची होती. त्यांच्या मेहनेतीचे आज चीज झाले आहे. त्याने असा एक फोटो काढला आणि तो दहा जागतिक विजेत्यांमध्ये आला आहे. तर हा पट्ट्या कोण? त्याने असा कोणता फोटो काढला? असाही सवाल तुम्हालाही पडला असेल. तर हा फोटो काढणारा आपला कोल्हापूरचा (Kolhapur) प्रज्वल चौगुले असून त्याने अॅपल ‘शॉट ऑन आयफोन’ मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. अॅपल ‘शॉट ऑन आयफोन’ मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजमध्ये कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेसह जगातील चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिका या देशांतील इतर नऊ विजेत्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचं आयोजन २५ जानेवारी २०२२ रोजी फोटोग्राफी प्रेमींसाठी करण्यात आलं होतं आणि १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रवेश स्वीकारण्यात आला होता.
अॅपल ‘शॉट ऑन आयफोन’ मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजमध्ये चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिका या देशांतील इतर नऊ विजेत्यांनी भाग घेतला होता. ज्यात प्रज्वल चौगुलेच्या नावाचाही समावेश होता. प्रज्वल चौगुलेने कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूचा फोटो काढला होता आणि तो स्पर्धेत पाठवला होता. त्याच्यासह इतरांनी काढलेले फोटो हे Apple.com वर, Apple च्या Instagram (@apple) वर टाकण्यात आले होते. तर प्रज्वल चौगुलेने कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूचा फोटो हा आयफोन १३ प्रोमध्ये काढला. हा फोटो पाहिल्यास जाळ्यावर पडलेले दवबिंदू हे चमकणारे मोती दिसत होते. या छायाचित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
याबाबतीत बोलताना प्रज्वल चौगुले म्हणाला, मला निसर्गात फिरायला आवडते. त्याचबरोबर फोटो काढायलाही आवडतात. मी माझ्या आयफोन १३ प्रोसह पहाटे फिरायला जातो. त्यावेळी मी निसर्गाने आपल्या कॅनव्हासवर केलेली मक्त उधळण मी फोटोच्या स्वरूपात कैद करण्याचा प्रयत्न करतो. मी काढलेल्या अनेक फोटोंनी छायाचित्रकारांना आनंद दिला आहे. माला तसे तर कोळ्याच्या जाळ्यावरील दव थेंबांचा फोटो घ्यायचा होता आणि तसा माझा प्रयत्न ही सुरू होता. पण भाग्य साथ देत नव्हते. पण तो क्षण आला आणि कोरड्या कोळ्याच्या रेशीमने हारावरिल दवाने मोत्यांचाल हार तयार केल्याचे माला दिसले. ते दव मोत्यासारखे चमकत होते. हे पाहून मी मोहित झालो. असं प्रज्वल चौगुलेने सांगितलं. तर हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर प्रतिक्रीया देताना, हे छायाचित्र अप्रतिम आहे. मोठ्या बारकाईने कोळ्याच्या जाळ्यावरील दवबिंदू टीपले गेले आहेत. असं काहीतरी निसर्गात घडतं याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती असतं, असं जज मेकर यांनी सांगितलं.