रत्नागिरीः कोकणातला मुख्य सण म्हणजे गणपती (Ganesh Chaturthi). यावर्षी 31 ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांना (Chakarmane) कोकणात येण्याचे वेध आत्तापासून लागले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) मुख्य गणपतीच्या दिवसांचे आरक्षण उद्यापासून सुरु होत आहे. रेल्वेचे 120 दिवस आगोदर आरक्षणाची व्यवस्था आहे. त्यानुसार 25 ऑगस्टला कोकणात येण्याचे आरक्षणाला आज सुरवात झाली आहे. कोकणच्या रेल्वेच्या या आरक्षणामुळे यंदा कोकणवासियांचा गणेश चतुर्थीसाठीचा प्रवास सुखकर होणार आहे.
कोरोना महामारीनंतर चाकरमानी आता कोकणात मोठ्या संख्येने जाण्याची शक्यता असल्याने रेल्वेकडून आतापासूनच सोय करुन देण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या या नियोजनामुळे कोकणवासियांचा प्रवास सुखकर होणार आहे. कोकणात जाण्यासाठी पाच ते सहा गाड्यांची सोय करुन देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कोकणातील गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.
कोकण कन्या, राज्यराणी एक्स्प्रेस, डब्बल डेक्कर, जनशताब्दी, तेजस एक्प्रेस अशा गाड्यांचे आरक्षणावर चाकरमान्यांचा जोर असणार आहे. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर येणारा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सज्ज असणार आहे.
कोकणचे रेल्व आरक्षण पुढीलप्रमाणे होणार आहे. गुरवार 28 एप्रिल शुक्रवारी, 26 ऑगस्ट, शुक्रवार 29 एप्रिल शनिवार 27 ऑगस्ट, शनिवार 30 एप्रिल, रविवार 28 ऑगस्ट, रविवार 1 मे- सोमवार 29 ऑगस्ट, सोमवार 2 मे-मंगळवार 30 ऑगस्ट( हरतालिका दिवस), मंगळवार 3 मे- बुधवार 31 ऑगस्ट ( गणेश चतुर्थी दिवस), बुधवार 4 मे– गुरवार 1 सष्टेंबर (ऋृषी पंचमी दिवस), शुक्रवार 6 मे शनिवार 3 सष्टेंबर ( गौरी आगमन दिवस), शनिवार 7 मे–रविवार 4 सष्टेंबर( गौरी पूजन दिवस), रविवार 8 मे सोमवार 5 सष्टेंबर( गौरी विसर्जन) अशा प्रकारे कोकण रेल्वेचे आरक्षण करण्यात आले आहे.