Prashant Koratkar : इंद्रजित सावंतांना मीच फोन केला, प्रशांत कोरटकरने दिली कबुली?

| Updated on: Mar 27, 2025 | 10:45 AM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेला प्रशांत कोरटकर सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याचाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे

Prashant Koratkar : इंद्रजित सावंतांना मीच फोन केला, प्रशांत कोरटकरने दिली कबुली?
प्रशांत कोरटकरची कबुली?
Image Credit source: social media
Follow us on

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेला प्रशांत कोरटकर सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याचाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. इंद्रजीत सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोबाईलमधील डाटादेखील डिलीट केल्याचं कोरटकरकडून मान्य करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पोलिसांनी मध्यरात्री 5 तास कोरटकरची चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

याच चौकशीत कोरटकरने कबुली दिली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

YouTube video player

मध्यरात्री प्रशांत कोरटकरला झाला छातीत दुखण्याचा त्रास

मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.  मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. तपासासाठी त्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आलं अशी माहितीही समोर आली आहे.

काय आहे प्रकरण ?

24 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती, असा आरोप आहे. त्यानंतर 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तेव्हापासूनच प्रशांत कोरटकर हा फरार होता. त्यानंतर 27 फेब्रुवारीला एक व्हिडीओ तयार करून कोरटकर याने माफी मागण्याचा प्रयत्न केला.

28 फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं त्याला अटकपूर्व जमीन मंजूर केला. कोल्हापूर पोलिसांनी त्यांचं म्हणणं मांडण्याआधीच कोरटकरचा जामीन मंजूर झाला. कोल्हापूर पोलिसांनी त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. 18 मार्चला कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. तो फरार झाल, तो दुबईला पळून गेल्याच्या चर्चाही सुरू होत्या.

अखेर दोन दिवसांपूर्वी कोरटकरला तेलंगणमधून अटक करण्यात आली व कोल्हापूरमध्ये आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. तेथे त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. आता पोलिसांच्या चौकशीत त्याने आपणच सावंताना धमकी दिल्याचे कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.