अहमदनगरः कर्जत तालुक्यातील प्रतीक पवार (Pratik Pawar Karjat Attack) या युवकावर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे. या हल्ल्याची चौकशी ‘एनआयए’कडे सोपविण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी केली होती. 4 ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील प्रतीक पवारवर सोशल मीडियावर नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे काही युवकांनी हल्ला केला होता. याप्रकरणी अहमदनगरला जाऊन आमदार नितेश राणे (BJP Nitesh Rane) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) यांनी या हल्ल्याप्रकरणी प्रतीकची भेट घेतली आहे. यावेळी नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाचा तात्काळ तपास करण्याची मागणी करुन आरोपींना शिक्षा करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आता महाविकास आघाडीचे सरकार नाही तर शिंदे-फडणवीस यांचे सरकार असल्याचे सांगत याप्रकरणी जे कोणी संबंधित आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
भाजपचे आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी आरोपींना लवकरात लवकर पकडून पोलिसांनी योग्य तपास करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी प्रतीक पवारवर झालेल्या हल्ल्यामुळे राजकारण प्रचंड तापले आहे, त्यामुळे आता नितेश राणे आणि थेट प्रतीक पवारची थेट भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, जास्त मस्ती केली तर सगळ्या गोष्टींचे औषध या सरकारकडे आहे असा थेट इशाराच नितेश राणे यांनी यावेळी दिला आहे.
हल्ला झालेल्या प्रतीक पवारला अन्य कारणांनी मारलं हे सर्व खोटं आहे, तू जास्त हिंदू हिंदू करतो नपूर शर्माचे स्टेटस ठेवतो असे आरोपी केल्याचे मुलांचे मेसेज असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे. तर मोदींना नाव ठेवणे, नुपूर शर्माला शिव्या घालणे हिंदूंना टार्गेट करणे, असे पुरावे त्या मुलांच्या मोबाईलमध्ये असल्याचंही राणी यांनी म्हटले आहे, तर पोलिसांनी उर्वरित आरोपींना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रतीक पवार याला मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करून प्रतीक पवारला न्याय देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी नितेश राणे यांनी म्हटले आहे की, कर्जत पोलीस निरीक्षक मस्ती करतोय त्याला आता कळवा महाविकास आघाडीचे सरकार नाहीये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
तसेच आता पालकमंत्री हसन मुश्रीफ नाही व नवाब मलिक पण नाही आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. जास्त मस्ती केली तर सगळ्या गोष्टींचे औषध या सरकारकडे आहे असा थेट इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे. आम्ही सर्व हिंदुत्ववादी सरकारचे प्रतिनिधी आहोत असे ही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
जेव्हा अमरावतीची घटना घडली तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते,तर ते म्हणत होते त्या मुलाचा पार्श्वभूमी खराब आहे मात्र एनआयए तपासात त्यांचं सिमी जिहादी कनेक्शन समोर आल आहे, तसेच या घटनेकड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारीक लक्ष ठेवून असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटले आहे.