कोल्हापूर : लडाखमध्ये लष्कराचा (Indian Army) ट्रक श्योक नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जवान शहीद झाले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एका जवानाचा समावेश असल्याची माहिती मिळतेय. प्रशांत जाधव असं शहीद (Martyr) जवानाचे नाव आहे. ते गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे रहिवासी होते. प्रशांत जावध यांचे पार्थिव उद्या बेळगावमध्ये आणलं जाणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तर साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील विसापूरचे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे देखील या अपघातात शहीद झाले आहेत. लडाख (Ladakh) तुर्तक भागात सैन्यदलाची गाडी श्योक नदीत पडली. यात 7 जवान शहीद आणि काही जवान जखमी झाले आहेत. इंडियन आर्मीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे, 26 जवानांची एक तुकडी परतापूरच्या हनीफ सेक्टरवरुन फॉरवर्ड पोस्टला जात होती. लडाख प्रदेशात 26 सैनिकांना घेऊन जाणारे वाहन गुरुवारी श्योक नदीत पडले, या अपघातात 7 जवानांचा मृत्यू झाला.
#WATCH | 7 Indian Army soldiers lost their lives in a vehicle accident in Turtuk sector of Ladakh earlier this evening. All 19 soldiers injured in the accident have been airlifted to Chandimandir Command Hospital.
(Video Source: Video shot by locals, verified by security forces) pic.twitter.com/xLYvfP7Qdw
— ANI (@ANI) May 27, 2022
लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘परतापूरच्या संक्रमण शिबिरातून 26 जवानांचा एक तुकडी उप-सेक्टर हनिफच्या फॉरवर्ड एरियाकडे जात होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास थोईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. वाहन सुमारे 50-60 फूट खाली नदीत पडले. 26 जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली आहे. तर आतापर्यंत 26 पैकी 7 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. इतर जवानांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
7 Indian Army soldiers lost their lives so far in a vehicle accident in Turtuk sector (Ladakh), grievous injuries to others too. Efforts on to ensure best medical care for injured, incl requisition of air effort from IAF to shift more serious ones to Western Command: Army Sources
— ANI (@ANI) May 27, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘लडाखमधील बस दुर्घटनेमुळे आम्ही दुःखी झालो आहोत. ज्यात आम्ही आमचे शूर सैनिक गमावले आहेत. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे होतील. बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.
Anguished by the bus accident in Ladakh in which we have lost our brave army personnel. My thoughts are with the bereaved families. I hope those injured recover at the earliest. All possible assistance is being given to the affected.
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2022
‘लडाखमधील बस दुर्घटनेत आपल्या शूर जवानांना प्राण गमवावे लागले. त्याचे खूप दु:ख आहे. त्यांनी देशाची केलेली सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत’. तसंच सिंह यांनी जमखी जवानन लवकरात लवकर बरे व्हावे अशा सदिच्छाही व्यक्त केल्या. सिंह म्हणाले की, मी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याशी बोललो. त्यांनी मला परिस्थितीची माहिती दिली आणि जखमी जवानांचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जखमी जवानांना लष्कर सर्वतोपरी मदत करत आहे’, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलीय.
Deeply saddened by the loss of lives of our brave Indian Army personnel due to a Bus tragedy in Ladakh. We will never forget their exemplary service to our nation. My condolences to the bereaved families and prayers for the speedy recovery of the injured. 1/2
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 27, 2022