Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणिंना 24 तासांच्या आत सरकारचं डबल गिफ्ट, घेतला मोठा निर्णय

| Updated on: Dec 24, 2024 | 5:59 PM

आजपासून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणिंना 24 तासांच्या आत सरकारचं डबल गिफ्ट, घेतला मोठा निर्णय
Follow us on

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, त्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलाच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.

जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्ते आतापर्यंत या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांप्रमाणे पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये मिळाले आहेत. निवडणुकीमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. दरम्यान त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान आजपासून लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे. पुढीच चार ते पाच दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे सरकारनं या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती, आता आशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसांत पैसे मिळणार आहेत. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे? 

आजपासून महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे. ९ ऑक्टोबरला शेवटचा हफ्ता दिला होता. २ कोटी ३४ लाख महिलांसोबत ज्या महिलांना आधार कार्ड मुळे अडचण आली होती त्यांना देखील आजपासून लाभ मिळेल. पुढील ४ ते ५ दिवसांत हफ्ता मिळणार आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.