विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, कुर्ल्यात शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. कुर्ल्यामध्ये महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकरांचा विजय निश्चित असून, विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं तसेच लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते कुर्ल्यात आयोजित प्रचारसभेमध्ये बोलत होते. कुर्ल्यामध्ये महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकरांचा विजय निश्चित असून, विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. ही पहिली प्रचार सभा आहे आणि त्याचा मान आपल्या कुर्ला मतदार संघाला मिळाला आहे. कुडाळकर ओपनिग बॅट्समॅन झाले आहेत, आणि आता बाकी लोकांना क्लीन बोल्ड करत डिपॉझिट जप्त झाले पाहिजे, फटाके फुटत आहेत , काही ठिकाणी लऊंगी आहेत. मात्र आपला ॲटम बॉम्ब फुटेल असा हल्लाबोल यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे असंही म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो, आता तुम्हाला वर्षाला नहीं तर महिन्याला भाऊबीज मिळणार आहे. विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद होईल, आम्ही महिलांना विकत घेतलं असं म्हणतात. या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना लाडकी बहीण जोडा दाखवणार आहे. ते मुंबई हायकोर्टात गेले, पण हायकोर्टानं त्यांना लाफा मारला. विरोधक म्हणतात आमचं सरकार आलं की या योजनेची चौकशी करून योजना बंद करणार, तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये टाकलेलं तुम्हाला चालेल का? असा सवाल करतानाच योजना सुरू करणे जर गुन्हा असेल तर असे दहा गुन्हे मी करेल असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी खटा खट म्हणाले होते व्होट घेतले , मात्र आता पैसे नाही म्हणतात. हिमाचलमध्ये योजना सुरू करून बंद केली, राजस्थानमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. आम्ही फेस टू फेस काम करणारे लोक आहोत, फेसबुक लाईव्ह करणारे लोक नाहीत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली.