Ladki Bahin yojana : नव्या सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा धक्का; या महिलांचे पैसे होणार बंद, आदिती तटकरेंची मोठी घोषणा

| Updated on: Jan 02, 2025 | 4:49 PM

लाडक्या बहिणींना धक्का देणारी बातमी आहे, मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजेनेबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Ladki Bahin yojana : नव्या सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा धक्का; या महिलांचे पैसे होणार बंद, आदिती तटकरेंची मोठी घोषणा
Follow us on

मोठी बातमी समोर येत आहे, लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशानं ही योजना सरकारनं चालू केली होती. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली, आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. काही महिलांना या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे, त्यानंतर आता ही मोठी बातमी समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे? 

लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. वेगवेगळ्या अँगलने आम्ही या तक्रारीची पडताळणी करणार आहोत.  काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहे, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे. मात्र मूळ जीआरमध्ये कोणताही बदल होणार नाही असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

कोणत्या अर्जांची पडताळणी होणार? 

1) ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची होणार स्क्रुटिनी

2) चार चाकी वाहनं असलेल्या महिलांच्या अर्जांची होणार पडताळणी

3) एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार स्कुटीनी

4) लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी

5) आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची पडताळणी होणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

दरम्यान अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाभार्थी महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा त्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत, अशा महिलांना आता या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याचा फटका हा राज्यातील अनेक महिलांना बसू शकतो.