मुंबई : दोन वर्षानंतर यंदा प्रथमच कोणत्याही निर्बंधाशिवाय राज्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या मुंबईतील लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी झाली होती. लालबागच्या राजाच्या चरणी यावर्षी भाविकांनी भरभरून दान केले आहे. याचा लिलाव आज झाला. लालाबागच्या राजाला दान म्हणून बाईक देखील मिळाली आहे.
बाप्पाच्या चरणी भाविकांनी दान केलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांचा लिलाव दरवर्षी केला जातो. आज याचा लिलाव झाला.
यावर्षी बाप्पाच्या चरणी जवळपास साडेपाच किलो सोने, 60 किलो चांदी, 5 कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम बाप्पाच्या दान पेटीच जमा झाली आहे.
चोने-चांदीचे दागिने आणि रोकडसह लालबागच्या राजाच्या चरणी एक हिरो कंपनीची बाईकही भाविकांनी दान केलेली आहे.
नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. यंदा अनेक राजकीय नेते तसेच सेलिब्रीटींनी लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतल. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंब लालाबगच्या राजाचे दर्शनासाठी आले होते. मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांनी पैशाचा हार लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला होता.
नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. यामुळेच लालबागचा राजा हा मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते.
यंदा देखील लाखो भाविकांनी लालबगाच्या राजाचे दर्शन घेतले. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी लालबागचा राजाला भरभरुन दान केले आहे. पहिला पाच दिवसातच लालबागच्या राजाच्या दानपेटीत एक कोटीपेक्षाही अधिकची देणगी जमा झाली होती.