सांगलीच्या गणेश खिंडीत धोका, संकट येण्याआधी प्रशासनाला जाग येईल का?

| Updated on: Jun 14, 2024 | 3:38 PM

गणेश खिंड या घाटातून कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातील नागरिक वाळवा तालुक्यातील भवानीनगर, ताकारी, इस्लामपूर, कराड या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. हा रहदारीचा घाट असल्यामुळे या घाटाची सुरक्षा महत्त्वाची आहे.

सांगलीच्या गणेश खिंडीत धोका, संकट येण्याआधी प्रशासनाला जाग येईल का?
Follow us on

सांगलीच्या गणेश खिंडीत दरड कोसळण्याच्या घटना सुरु आहेत. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गणेश खिंडीत कालच दरड कोसळणल्याची घटना घडली. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. सांगलीच्या कडेगाव आणि वाळवा तालुक्याला जोडणाऱ्या गणेश खिंड या अतिवळणाच्या घाटात गेल्या 15 दिवसात तीन वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही प्रवाशांसाठी हा धोक्याचा घाट बनला आहे. दरड कोसळणाऱ्या घटनेकडे प्रशासनाने पूर्णत्व दुर्लक्ष केल्याची दिसून येत आहे.

गणेश खिंड या घाटातून कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातील नागरिक वाळवा तालुक्यातील भवानीनगर, ताकारी, इस्लामपूर, कराड या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. हा रहदारीचा घाट असल्यामुळे या घाटाची सुरक्षा महत्त्वाची आहे. या घाटात अतिउंच दगडाच्या कडा आहेत. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की या कडांना पडलेल्या भेगांमध्ये पावसाचे पाणी साठते आणि भल्या मोठ्या दगडाच्या शिळा वेगाने रस्त्यावर येतात.

15 दिवसात घाटात तीन वेळा दगडाच्या शिळा कोसळल्या

या घटना नेहमीच घडत असतात. मात्र पावसाळ्यापूर्वी या धोकादायक दगडाच्या कडा प्रशासनाने काढून घेणे महत्त्वाचे असते. मात्र प्रशासन याकडे नेहमी दुर्लक्ष करीत आहे. गेल्या पंधरा दिवसात या घाटात तीन वेळा दगडाच्या शिळा रस्त्यावर आले आहेत. यामध्ये कोणत्या प्रकारची जीवितहानी अथवा नुकसान झाले नसले तरी नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवितास धोका आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन या घाटातील धोकादायक दगड काढून घ्यावे, अशी मागणी होत आहे.