रेल्वेने उडवल्याने चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू, लासलगाव येथे भीषण अपघात, कसा झाला अपघात ?

| Updated on: Feb 13, 2023 | 1:03 PM

नाशिकच्या लासलगाव - उगाव स्टेशनच्या दरम्यान अपघात घडला आहे. लाइन दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाच अपघातात मृत्यू झाला आहे.

रेल्वेने उडवल्याने चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू, लासलगाव येथे भीषण अपघात, कसा झाला अपघात ?
Image Credit source: Google
Follow us on

लासलगाव, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लासगाव ( Lasalgaon Accident ) येथे चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज ( सोमवार, 13 फेब्रुवारी ) ला सकाळी सहा वाजता अपघात झाला आहे. लासलगाव ते उगाव दरम्यान ही दुर्दैवी ( Railway Accident ) घटना घडली आहे. रेल्वे कामगारांचा अपघातात मृत्यू झाल्याने स्टेशन परिसरासह मध्य रेल्वेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात संतोष भाऊराव केदारे ( वय – 38 वर्षे ), दिनेश सहादु दराडे ( वय – 35 वर्षे ), कृष्णा आत्मराम अहिरे ( वय – 40 वर्षे ) संतोष सुखदेव शिरसाठ ( वय – 38 वर्षे ) अशी चौघांची नावे आहेत.

रेल्वे लाइन दुरुस्त करणाऱ्या टॉवरने धडक दिल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. लासलगाव ते उगाव दरम्यान हा अपघात घडला आहे. लाइन दुरुस्त करणाऱ्या इंजिनेच ही घडक दिल्याने अपघात घडला आहे. यामध्ये चौघांचा नाहक बळी गेल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेल्वेतील हे सर्व कर्मचारी आहे. सकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याचीही परिस्थिती नव्हती. त्यामुळे काही क्षणातच चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण रेल्वे वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

सकाळी सहाच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडले आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वे उशिराने पोहचणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मनमाड भुसावळ कडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याही उशिरा पोहचणार आहे.

अपघात घडल्यानंतर बऱ्याच वेळ स्टेशन परीसरात खळबळ उडाली होती. अशातच मदतीसाठी रेल्वे पोलिसांसह आरोग्य पथक बोलावण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यानंतर पंचनामा आणि इतर माहितीसाठी धावाधाव सुरू झाल्याने आणि इंजिनही घटनास्थळी असल्याने रेल्वे सेवा काही तास ठप्प झाली होती.

अशी घडली घटना –

लासलगाव ते उगाव दरम्यान ट्रॅक मेंटनचे काम सुरू होते. याला ब्लॉक तयारी देखील म्हणतात. किमी 230 जवळ रेल्वेचा पोल क्रमांक 15 ते 17 दरम्यान ब्लॉक तयारी केली जात होती. याच दरम्यान लाइन दुरुस्त करणारे इंजिन म्हणजे टॉवर रॉग डायव्हरशने जात होते. त्याचा मार्ग लासलगावकडून उगावच्या दिशेने होता. गॅंगमन ट्रॅकवर काम करत असतांना रेल्वे लाइन मेंटनेस करणाऱ्या टॉवरने धडक दिली आहे. या अपघातात काम करणाऱ्या चौघांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.