नाशिकः लतादीदींच्या (Lata Mangeshkar) आवाजाने प्रत्येकावर गारूड केले. त्यांनी गायिलेल्या प्रत्येक गाणे सुरू झाले की, आपसुकच मान डोलावली जाते. मग तो साहित्यिक असो, चित्रकार असो, क्रीडापटू असो की राजकारणी. त्यामुळेच आज भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Praveen Darekar) लतादीदी परमेश्वरी अवतार आहेत. त्यांनी जगाच्या पाठीवर देशाचे नाव मोठे केले, अशी भावुक प्रतिक्रिया दिली. जनतेच्या आशीर्वादाने त्या लवकर बऱ्या होतील. मी देखील प्रार्थना करतो, असे दरेकर म्हणाले. मात्र, पुढल्या काही मिनिटांत लतादीदींच्या निधनाची वार्ता येऊन धडकली. त्यामुळे दरेकरही भावुक झाले. त्यानंतर ते म्हणाले की, लतादीदींचे जाणे ही देशाच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना आहे. लतादीदी नावाच्या युगाचा अंत झालाय. देशाची कधी भरून न निघणारी ही पोकळीय. संगीत क्षेत्रातील या वार्तेने मन सुन्न झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हल्ला पूर्वनियोजित
दरम्यान, तत्पूर्वी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडी सरकारने छळवाद मांडलाय. नितेश राणे हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या अविर्भावात सरकार काम करत आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालीय. मात्र, परिवहन मंत्री एसटी प्रश्न सोडवू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. दरेकर पुढे म्हणाले की, सोमय्या यांच्यावर हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता. अनिल परब म्हणतात हे होणारच होतं. 100 ते 150 शिवसैनिकांनी हा कट पार पडला. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. झेड सिक्युरिटीच्या कवचात असलेल्या नेत्यावर जीवघेणा हल्ला लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तर सरकार जबाबदार
दरेकर म्हणाले, भाजपने उद्या जर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले, तर त्याला सरकार जवाबदार असेल. राहिलेल्या शिवसैनिकांवर देखील कारवाई करावी. देशात लोकशाही आहे. सोमय्या ज्या पद्धतीने पुराव्या सहित प्रकरण बाहेर काढत आहेत, याचा अर्थ सोमय्या यांनी केलेले आरोप खरे आहेत. भविष्यात आपण उघडे पडणार या भीतीने हल्ला केला. हल्ला करणारे शिवसैनिक आहेत. त्यांना आदेश कोण देते हे सगळ्यांना माहित आहे, असा आरोप त्यांनी केला. अजित पवार आणि उदयन राजे यांची भेट विकासकामांसाठी होते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
Nashik | आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी शाळेत 1 लीचे प्रवेश सुरू; काय आहेत नियम, अटी, योजना?