Latur : संपाचा 100 वा दिवस, लातूरात 256 एसटी कामगार बडतर्फ, तरीही संप सुरुच

| Updated on: Feb 06, 2022 | 12:08 PM

दरम्यानच्या काळात लातूर विभागातील 5 आगारांमधील संपात सहभागी झालेल्या 1 हजार 648 कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 256 कामगारांना बडतर्फ करण्यात आले आहे तर 343 जणांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.

Latur : संपाचा 100 वा दिवस, लातूरात 256 एसटी कामगार बडतर्फ, तरीही संप सुरुच
लातूर मध्यवर्ती बसस्थानक
Follow us on

लातूर : (ST Corporation) एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करावे या मागणीसाठी गेल्या 100 दिवसांपासून एसटी कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत. त्यामुळे (Inconvenience to passengers) प्रवाशांची गैरसोय होत असून आता आगाराच्यावतीने वेगवेगळे पर्याय अवलंबले जात आहेत. दरम्यानच्या काळात (Latur Division) लातूर विभागातील 5 आगारांमधील संपात सहभागी झालेल्या 1 हजार 648 कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 256 कामगारांना बडतर्फ करण्यात आले आहे तर 343 जणांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. शिवाय लालपरीची सेवा सुरु करण्यात आली असून आता कंत्राटी कर्मचारी नेमण्यावर भर दिला जात आहे. आठ दिवसांपूर्वीच 50 कंत्राटी चालकांची भरती करण्यात आल्याने विविध मार्गावर बसेस या धावल्या आहेत.

अशी झाली आहे कारवाई..

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप गेल्या 100 दिवसांपासून सुरुच आहे. प्रवाशांची होत असलेली गैरसोय यामुळे आता प्रशासनाला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागत आहेत. लातूर विभागात आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या दरम्यानच्या काळात 343 जणांचे निलंबन तर 94 कर्मचाऱ्यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. लातूर विभागातील औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि लातूर आगारातील 701 कर्मचाऱ्यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. बडतर्फ करण्याचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले कर्मचारी हे संपावर ठाम आहेत.

80 बसेस रस्त्यावर..

एकीकडे कर्मचाऱ्यांचा संप सुरु असला तरी आता प्रवाशांना सेवा मिळावी या उद्देशाने विभागाकडून हालचाली सुरु आहेत. त्याच अनुशंगाने गत आठवड्यापासून कंत्राटी वाहन चालकांची भरती सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत 50 कर्मचारी हे सेवेत रुजू झाले आहेत. विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा आणि निलंगा या आगारातून 80 बसेस या धावल्या आहेत. 15 वाहतूक नियंत्रकही वाहक म्हणून सेवा बजावत आहेत. त्यामुळे प्रवाशी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

नाशिकच्या खासगी एजन्सीकडून भरती

एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबत असला तरी आता वेगळ्या पर्यायांचा विचार केला जात आहे. गेल्या 95 दिवासांपासून प्रवाशी सेवा ही कोलमडलेली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या एका खासगी एजन्सीकडून चालक भरती करुन घेतले जात आहेत. पहिल्या टप्प्यात 50 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. सेवा सुरळीत झाल्यावर यामध्ये अणखीन वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Latur: आता ‘लालपरी’ धावणार, प्रशासनाच्या एका निर्णयामुळे 5 आगारातील प्रवाशांची होणार वाहतूक

Latur : …असा मिटला कुटुंबावरील बहिष्कार घटनेचा वाद, नेमकं काय घडलं ताडमुगळी गावात?

कामगारांबद्दल बोलल्यावर माझ्यावर 2 लाखांच्या खंडणीची केस; चिंधीचोर वाटलो का? MIDC च्या दुरावस्थेवर उदयनराजे भोसले आक्रमक