लातूरमध्ये मतदारांचे बंड? सुधाकर श्रंगारे यांची वाट बिकट, काँग्रेसचे शिवाजी कळगे यांची आघाडी

| Updated on: Jun 04, 2024 | 2:53 PM

Latur Lok Sabha Election Results 2024 : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीचा सामना रंगला आहे. हा सामना आता एकांगी रंगत चालल्याने भाजपची चिंता वाढत चालली आहे. केंद्रात 400 पारचा नारा सोडा, 300 चा गड गाठण्यासाठी एकएक जागा महत्वाची ठरत आहे.

लातूरमध्ये मतदारांचे बंड? सुधाकर श्रंगारे यांची वाट बिकट, काँग्रेसचे शिवाजी कळगे यांची आघाडी
काँग्रेसने उभे केले मोठे आव्हान
Follow us on

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याचे कल आणि आता निकाल यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. देशात भाजपने 400 पारचा नारा दिला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता 300 मतांचा आकडा गाठताना त्यांना एक एक जागा महत्वाची झाली आहे. धाराशिव, परभणी, नांदेडमधील चित्र भाजपला मोठ्या धोक्याचे संकेत देत आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्थात पुढील दोन तासांत चित्र स्पष्ट होईल. लातूरमध्ये पण समीकरणं पूर्णपणे बदलून गेले आहे.

55.38 टक्के मतदान

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील लातूर हा एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ 1962 साली अस्तित्वात आला होता. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात येथे 7 मे रोजी मतदान झाले होते. या मतदारसंघातील 55.38 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची भाऊगर्दी आहे. पण मुख्य मुकाबला हा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आहे. भाजपने या लोकसभा मतदारसंघासाठी तुकाराम श्रंगारे यांना मैदानात उतरवले तर काँग्रेसची धुरा डॉ. शिवाजीरावर काळगे यांच्या खांद्यावर आहे.

हे सुद्धा वाचा

2019 मध्ये मोदी मॅजिक

वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता. भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांनी काँग्रेसचे त्यावेळचे उमेदवार मच्छिन्द्र कामत यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यावेली श्रंगारे यांना 6,61,495 मतं मिळाली होती. तर कामत यांना 3,72,384 मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर यांनी मोठी खेळी खेळली होती. त्यांना 1,12,255 मते मिळाली होती.

यावेळी काँग्रेसचा मजबूत डाव

यावेळी काँग्रेसने या लोकसभा मतदारसंघाची मजबूत बांधणी केली. मराठवाड्यातील काँग्रेसचे मोठे नेतृत्व अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसचे आमदार, स्थानिक प्रतिनिधींनी या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली. सध्याच्या आकडेवारीनुसार, डॉ. शिवाजी कळगे यांना 2,96,257 मते आहेत. तर सुधाकर श्रंगारे यांना 2,59,955 मते पडली आहेत. कळगे यांनी 36,302 मतांची आघाडी घेतली आहे. आता तीन वाजेनंतर श्रंगारे हे लीड कापत आणतात का हे पाहणे महत्वाचे ठरेल.