लातूर : राजकारणातले एक दिलखुलास व्यक्तिमत्व माजी मुख्यमंत्री (Vilasrao Deshmukh) स्व.विलासराव देशमुख यांची गुरुवारी 77 वी जयंती जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी पार पडली. बाभळगाव येथील त्यांच्या (Salutations at the tomb site) समाधी स्थळी अभिवादन करण्यासाठी सर्वक्षीय नेते एकवटले होते. तर सकाळपासूनच लातुरकरांनी समाधीस्थळी एकच गर्दी केली होती. राज्याची धुरा सांभाळत असतानाही (Latur) लातुरकरांशी त्यांची नाळ कशी जोडली गेली होती त्याचे किस्से आजही लातुरकर तेवढ्याच आत्मियतेने मांडतात. राजकारणात अजात शूत्र असे व्यक्तिमत्व असलेले विलासराव यांची दिवसभरात एकदा तरी आठवण निघाल्याशिवाय लातुरकरांचा दिवस हा मावळत नाही. गुरुवारीही त्यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम तर झालेच पण जो तो त्यांच्या बाबतीत झालेला किस्सा मांडत होता.
स्व. विलासराव देशमुखम यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर तसेच समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले होते. तर दिवस उजाडल्यापासून लातुरातील नागरिकांची पावले ही बाभळगावच्या दिशेने निघाली होती. लातुरकर आणि विलासराव देशमुख यांचे एक वेगळे नाते होते. आजही त्यांच्या जयंती निमित्ताने प्रत्येक त्यांच्या बरोबरची आठवण ही सोशल मिडीयावर शेअर करीत आहे. तर सकाळी देशमुख कुटुंबातील सर्वांनी त्याच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी अमित देशमुख , आमदार- धिरज देशमुख , माजी मंत्री- दिलीपराव देशमुख, विलासरावांच्या पत्नी वैशालीताई देशमुख यांनी विलासरावांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केले . यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे ,माजी खासदार -डॉ .सुनील गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .
विलासराव देशमुख राज्याच्या मुख्यमंत्री विराजमान असतानाही देखील त्यांनी सुडभावनेने राजकारण केले नाही. त्यांची अदा, भाषण शैली आणि शब्द सामुग्रीवर असलेली पकड याची भुरळ विरोधकांना देखील होती. आजही जेव्हा विलासराव देखमुख यांचा विषय असतो तेव्हा विरोधकांची भूमिका ही देखील नरमाईची असते. स्व. विलासराव देशमुखांनी सर्वसामान्यांच्या मनात तर घर केलेच पण यामधून विरोधक सुध्दा सुटू शकले नाही.
गुरुवारी सकाळी 8 वाजता विलासबाग येथे सर्व लातुरकर हे स्थानापन्न झाले होते. सकाळी 9 वाजता संगीतकार डॉ.वृषाली देशमुख-कोरडे व शशिकांत देशमुख यांच्या सहकाऱ्यांकडून शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावदर्पण हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सकाळी 9.45 वाजता शेवटचे भजन तर 10 पासून पुष्पअर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. हे कार्यक्रम समाधी स्थळी झाले असले तरी लातूर शहरात आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडले.