नाशिक : हर हर महादेव या चित्रपटावर राजकीय शो रंगलेला असताना नाशिकमध्ये मनसेने कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. चित्रपट सुरू करण्याची मागणी थेट मनसेच्या विधी शाखेने नोटीसीद्वारे केली आहे. चित्रपटगृहाच्या मालक-चालक यांना नोटिसा दिल्या असून चित्रपट सुरू न केल्यास थेट लायसन्स रद्द करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा नोटिसद्वारे देण्यात आला आहे. नागरिकांची मागणी असतांना तुम्ही राजकीय दबावापोटी हर हर महादेव चित्रपट बंद ठेवला असल्याचा ठपका ठेवला आहे. सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलेली असतांना चित्रपट बंद केल्याप्रकरणी लायसन्स रद्द करण्याची मागणी कोर्टात करू असा इशारा दिला आहे. नाशिकच्या चित्रपट गृहांना ही नोटिस बजावण्यात आली असून चित्रपट पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली आहे. नाशिकमध्ये हर हर महादेव चित्रपट सुरू करण्याबाबत मनसे चांगलीच आक्रमक झाली असून चित्रपट सुरू होतात की राजकीय पक्षांचा राडा होतो हे बघनं महत्वाचे ठरणार आहे.
मनसेच्या विधी विभागाचे नितीन पंडित यांनी नाशिकमधील सर्वच चित्रपट गृहांच्या प्रशासनाला आज कायदेशीर नोटिस दिली आहे.
या नोटिसमध्ये म्हंटल आहे की, सदर चित्रपट मराठी माणसाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असून राजकीय पक्ष राष्ट्रवादि कॉंग्रेस व इतर काही संघटना मराठी माणसाच्या असलेला चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
तरी चित्रपटगृहानी असे करून नागरिकांचा संविधानिक हक्क हिरावून घेण्यात प्रयत्न करत आहे. सदरच्या चित्रपटास भारतीय सेन्सर बोर्डाने सर्व तपासाअंती चित्रपट प्रसारित करण्या बाबत प्रमाण पत्र दिलेले आहे.
राजकीय पक्ष राजकारण करत असून त्या राजकारणाला बळी पडून चित्रपट प्रसारित करण्यापासून मज्जाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक चित्रपट पाहण्या पासून वंचित राहिले आहेत.
चित्रपटा मध्ये काही आक्षेपार्य काही असेल तर भारतीय सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतला असता, परंतु मराठी चित्रपट “हर हर महादेव” भारतीय सेन्सर बोर्डाने प्रमाणपत्र देऊन चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे.
चित्रपटामध्ये काही आक्षेपार्य काही असेल तर राजकीय संघटना भारतीय सेन्सर बोर्डाशी संपर्क साधु शकता. परंतु नाशिकच्या चित्रपटगृहांनी चित्रपट बंद करण्याचा राजकीय दवाबा पोटी अधिकार नाही.
नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसाच्या आत सदरील मराठी चित्रपट “हर हर महादेव” जर पुन्हा नागरिकाच्या मागणीनुसार प्रदर्शित केला नाही तर तुमच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट सिनेमा रेगुलेशन ऍक्ट १९६६ अंतर्गत तुमचे चित्रपट प्रदर्शित करण्याचे लायसन्स रदद करण्याकरिता कोर्टामार्फत कायदेशीर कार्यवाही करु व ग्राहकांचा हक्क भंग झाल्या प्रकरणी नाशिक ग्राहक हक्क मंच येथे तक्रार करण्यात येईल असं मनसेच्या विधी विभागाच्या नोटिसमध्ये म्हंटल आहे.