सांगली : उन्हाळा (summer) सुरु झाल्यापासून लिंबूची बाजारात (Lemon market) आवक जास्त वाढली आहे. जिल्ह्याच्या कृषी मार्केटमध्ये विविध दर असल्याचे आढळून येत आहे. रोजच्या जेवणातील घटक लिंबू महाग झाल्यामुळे सामान्य नागरिकांसह व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचं प्रमाण अधिक असतं. त्याचबरोबर अनेक हंगामी व्यवसाय (Seasonal business) म्हणून लिंबू पाण्याची विक्री करतात. चांगल्या लिंबूसाठी शेकड्याला आठशे रुपये मोजावे लागत आहेत. काही हॉटेलमध्ये जेवणाबरोबर लिंबू मिळणार नाही अशा पद्धतीचे बॅनर लावले आहेत. सध्या चांगला लिंबू बाजारात 10 ते 15 रूपयांनी विकला जात आहे.
लिंबूच्या दराने तोंडचे पाणी अनेकांच्या पळाले, 1 लिंबू 10 ते 15 रूपये झाल्याने हॉटेलमध्ये कोणत्याही पदर्थासोबत लिंबू मिळणार नाही असे बोर्ड झळकले आहेत. त्यामुळे अनेकांना जेवणानंतर लिंबू मिळणार नाहीत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लिंबू महाग झाल्यामुळे जेवताना लिंबू मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे.
लिंबू बघितला की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पण आज लिंबूचा दर भडकल्याने सर्वांच तोंडाचे पाणी पळाले आहे 1 ते 2 रूपयाचा लिंबू आता 10 ते 15 रूपये झाला आहे. सद्या कडक उन्हाळ्यात लिंबूचा दर भडकल्याने लिंबू सरबत ही महाग झाला आहे. आवक कमी झाल्याने लिंबू महाग झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. चांगल्या प्रतीचा लिंबू शेकडा 700 ते 800 रुपये दराने व्यापाऱ्यांना मिळतं असल्याने या उन्हात दिवसभर बसून लिंबू विकताना चार पैसे पदरात पडेनासे झाले आहे. लिंबू खरेदीला आलेले ग्राहक दर ऐकून आल्या पावली परत जाताना दिसत आहेत. आज हॉटेलमध्ये तर कोणत्याही पदार्थासोबत लिंबू मिळणार नाही, असे बोर्ड लागले आहेत. आता जेवण नाष्टा लिंबू शिवाय करण्याची वेळ आली आहे.
बाजारात आलेला सामान्य माणूस लिंबू परवडेना म्हणून खरेदी करीत नसल्याची तक्रार व्यापारी करीत आहेत. त्याचबरोबर लिंबूचा दर अजून असा किती दिवस राहणार याबाबत कसल्याही प्रकारची माहिती नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. लिंबू महाग झाल्यामुळे लिंबू पाणी विकणाऱ्यांनी सुध्दा दर वाढवले आहेत. त्या व्यवसायाकडे सुध्दा ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.