नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर आहे. अनेक नागरिकांवर हल्ला केल्यानंतर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागते. त्यामुळे नाशिकमध्ये बिबट्याचा संचार पाहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत असते. त्यानंतर पिंजरा लावून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागते. याच काळात वेगवेगळे व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते. पण नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नाशिक जिल्ह्यातील बिबट्याचा धुमाकूळ काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये. नाशिक शहरातील ग्रामीण भागात बिबट्याचा संचार हा अनेकदा दिसून आलेला आहे आता मात्र नुकताच बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्यामध्ये जे काय घडलं त्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होऊ लागलेली आहे मांजरीचा पाठलाग करताना बिबट्यासह मांजर विहिरीत पडली आहे. भक्षच्या शोधात असलेल्या बिबट्याने मांजरीवर झडप घातली होती.
विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेव्हा मांजर भिडते, नाशिकमधील व्हिडिओ व्हायरल #nashik #Cat #Leopard #viralvideo pic.twitter.com/ZPB8dQDmjC
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) February 14, 2023
झडप घालत असतांना जवळच विहीर होती, त्यामुळे ही बाब लक्षात न आल्याने मांजरीसह बिबट्याचा विहिरीत पडला होता. आज पहाटेच्या वेळेला हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
मांजरीचा आणि बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. नाशिकच्या सिन्नर मधील टेंभूरवाडी येथे ही घटना घडली आहे. टेंभूरवाडीचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
विहिरीत पडलेल्या बिबट्याने आपला जीव वाचविण्यासाठी मोटर ठेवण्यासाठी असलेल्या स्टँडचा सहारा घेतला. त्यामध्ये मांजरीला मात्र कुठलाही सहारा मिळत नसल्याने तीने थेट बिबट्याच्या शेपटीचाच सहारा घेतला आहे.
विशेष म्हणजे हा संपूर्ण खेळ वनविभागाचे अधिकारी येईपर्यन्त सुरू होता. विशेष म्हणजे या दरम्यान मांजरीने थेट बिबट्याच्या पाठीवर चढण्याचा प्रयत्न केल्याने मांजर थेट भिडून गेल्याचे पाहायला मिळाले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत गावकऱ्यांनी कळविले होते. सांगळे मळ्यात हा प्रसंग घडल्याची माहिती देताच वनविभागाचे अधिकारी पोहचले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मांजरीसह बिबट्याची देखील सुटका केली आहे.
पिंजरा लावून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढले असून मांजरीला देखील सुखरूप बाहेर काढले आहे. जवळपास तासभर ही कसरत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना करावी लागली आहे.
नेहमीच बिबट्याचे कुठले ना कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतांना नाशिकमधील हा व्हिडिओ मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. मांजरीने केलेले धाडस यावेळी मात्र कौतुकाचा विषय ठरत आहे.