मनमाड : मनमाड-चांदवड रोडवर पुन्हा एकदा नागरिकांना बिबट्याचे दर्शन झालं. मनमाड-चांदवड रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्या फिरताना दिसून आला. त्यासंबंधीचा व्हिडीओ देखील व्हायरल होऊ लागला आहे. एकीकडे सोलापूर, पुणे आणि अहमदनगरच्या काही भागांत बिबट्याचा धुमाकूळ चालू असताना दुसरीकडे मनमाड-चांदवड रोडवर बिबट्याचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (Leopard in manmad Chandwad Road Fear in Citizen)
मनमाड-चांदवड रोडवर रात्रीच्या वेळी बिबट्याचं दर्शन झालं. रोडवर त्याचा यथेच्छ वावर सुरु असल्याचं पाहायला मिळालं. एकाच दिवशी दोनदा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिक भेदरुन गेले आहेत. बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
मनमाड-चांदवड रोडवर रात्रीच्या वेळी भूकलेला बिबट्या सशाची शिकार करताना दिसून आला. रोडवरुन बिबट्या चालत असताना समोर त्याला ससा दिसला. सावज टप्प्यात येताच त्याने झडप घातली अन् सशाची शिकार करण्याचा प्रयत्न केला. पण चपळ सशाने अलगदपणे बिबट्याच्या तोंडातून उडी मारली आणि धूम ठोकली.
ग्रामीण भागांत दिवसा वीज नसल्याने शेतात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जावं लागतं. दिवसा लाईटच नसल्याने बहुतांश वेळा त्यांना रात्रीचंच पाणी देण्याची वेळ येते. अशात आता परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी केलीये.
यंदाच्या वर्षी राज्यात बिबट्यांचा लोकवस्तीवरील वावर वाढला आहे. ग्रामीण भागांत, शेतांत तर बिबट्याचं दर्शन होतंच आहे परंतु शहरांतील सोसायटीत देखील बिबट्याचं दर्शन होऊ लागलं आहे. या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 30 लोकांचा मृत्यू झालाय तर अनेक लोकांना बिबट्याने जखमी केलंय. राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिबट्याच्या भितीनं झोप उडाली आहे. (Leopard in manmad Chandwad Road Fear in Citizen)
संबंधित बातम्या
48 तासांत बिबट्याला पकडा, अन्यधा गोळ्या घालण्याचे आदेश देऊ; वडेट्टीवारांचे वनविभागाला निर्देश