Video : चालकाचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर, पुरात वाहून जाणाऱ्या वाहनातून जवानाने केली प्रवाशांची सुटका

| Updated on: Jul 10, 2022 | 7:58 AM

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रवाशांनी भरलेले वाहन नाल्याच्या पुरात घालणे चांगलेच आंगलट आले आहे. यातील प्रवाशांचा (Passengers) जीव थोडक्यात बचावला.

Video : चालकाचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर, पुरात वाहून जाणाऱ्या वाहनातून जवानाने केली प्रवाशांची सुटका
Follow us on

चंद्रपूर :  चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रवाशांनी भरलेले वाहन नाल्याच्या पुरात घालणे चांगलेच आंगलट आले आहे. यातील प्रवाशांचा (Passengers) जीव थोडक्यात बचावला. ही घटना भद्रावती (Bhadravati) तालुक्यातल्या टाकळी-पानवडाळा परिसरातील आहे. जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. चालक आपली टाटा मॅजिक गाडी घेऊन टाकळी -पानवडाळाच्या दिशेने येत होता. या वाहानात एकूण पाच जण होते. चालकाला नाल्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्याने वाहन पाण्यात घातले. मात्र नाल्याला पूर आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन वाहून जाऊ लागले. वाहन वाहून जात असल्याचे लक्षात येताच त्यामध्ये असलेल्या लोकांनी गाडीच्या टपावर आश्रय घेतला. स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नाने या प्रवाशांना वाचवले.

जवानाने वाचवले प्राण

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भद्रावती तालुक्यातील टाकळी -पानवडाळा परिसरात असलेल्या नाल्याला पूर आला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाने प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी ही त्या पुरात घातली. पुराच्या पाण्यात ही गाडी वाहून जाऊ लागली. या गाडीमध्ये एकूण पाच प्रवासी होते. गाडी वाहून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी वाहनाच्या छतावर आश्रय घेतला.     माहिती मिळताच गावातील नागरिकांसह भारतीय सैन्यात असलेल्या आणि सुटीवर गावात आलेल्या निखिल काळे या जवानाने घटनास्थळी धाव घेत भर पावसात बचावकार्य राबविले. स्थानिकांनी दाखविलेल्या धाडसाने प्रवाशांची या संकटातून सुखरूप सुटका झाली आहे. जवान निखिळ काळे यांनी प्रसंगावधान राखून मोठ्या हिमतीने या प्रवाशांचा जीव वाचवला याबद्दल त्यांचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

राज्यात आता मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान नदी काठच्या लोकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. असे असून देखील अनेक जणांकडून पुराच्या पाण्यात वाहने घातली जातात. यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते.