औरंगाबाद: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे औरंगाबाद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार औरंगाबादमधील गर्दीच्या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) करण्यात येणार आहे. पैठण गेट, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, जाधवमंडी हे औरंगाबादमधील सर्वाधिक गर्दी होणारे परिसर मानले जातात. या गर्दीमुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी स्थानिक प्रशासनाने या भागांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इतर परिसरांमध्येही कडक निर्बंध लागू असतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (Lockdown in Aurangabad Maharshtra at crowded places)
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी दिवसभऱात कोरोनाच्या 371 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 51, 287 वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी 47564 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत 1278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2445 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
अमरावती जिल्ह्यात शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पाठोपाठ अमरावती शहराचं आरोग्य व स्वच्छता सांभाळणाऱ्या अमरावती महापालिकेतील 80 कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, यापैकी पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांमध्ये झोन क्रमांक 1,2,3 चे सहायक आयुक्त,शहर अभियंता,सिस्टीम मॅनेजर,विधी अधिकारी, डेप्युटी इंजिनिअर,डॉक्टर,लिपिक आदींचा समावेश आहे. यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा चांगलाच ताण येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांचा (Coronavirus) आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे आता महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी पुण्यातील (Pune) 10 क्षेत्रीय कार्यालयांच्या विभागात 42 कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये हडपसर परिसरात सर्वाधिक पाच कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे हडपसर परिसर सध्या पुण्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसतोय. पुणे महानगरपालिकेकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोठ्या इमारतींमध्ये रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या:
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची मोठी घोषणा
आंगणेवाडी यात्रा मार्ग सील; आंगणे कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा मंदिरात आरोग्य तपासणीनंतर प्रवेश
कोरोनाचा कहर वाढला; महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश बंदी!
(Lockdown in Aurangabad Maharshtra at crowded places)