मुंबई | 16 मार्च 2024 : यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे… महाराष्ट्रात आधी लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणुका देशात होऊ घातल्या आहेत. अशात ज्या निवडणुकीकडे देशासह जगाचं लक्ष लागलं आहे. त्या लोकसभेच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल. 17 व्या लोकसभेचा कार्यकाल 16 जूनला संपणार आहे. त्याआधी 18 व्या लोकसभेचं गठण होणं आवश्यक आहे. त्यामुळे आज या निवडणुकांची घोषणा होणार आहे. सहा ते सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. या शिवाय काही राज्याच्या विधानसभा निवडणुकांचीही घोषणा आजच केली जाऊ शकते.
लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेवर, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, ” निवडणूक आयोगाची इच्छा असेल तर ते 10 टप्प्यांत निवडणुका घेऊ शकतात, याआधीच्या निवडणुकाही 7 टप्प्यात झाल्या होत्या, यावरून असे दिसून येते की, काहीच बदलले नाही. आम्ही अजूनही 7 टप्प्यांच्या प्रक्रियेत अडकलो आहोत. आपण डिजिटल इंडियाबद्दल बोलतो पण 7 टप्प्यांच्या प्रक्रियेवरच अडकलो आहोत. तसेच, जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असत्या तर बरे झाले असते. बरे झाले आहे, आम्ही सप्टेंबरपर्यंत का वाट पाहत आहोत?”
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखांच्या घोषणेवर, शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, निवडणूक आयोगाने थोडा विचार करून निवडणुकांचा एवढा मोठा कालावधी ठेवला असेल. निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होतील अशी आशा आहे. जर निवडणूक आयोगाने कारवाई केली तर सर्व पक्षांना समानता द्यावी.”
#WATCH मुंबई: लोकसभा चुनाव 2024 की तारीखों की घोषणा पर शिवसेना(UBT) सांसद प्रियंका चतुर्वेदी ने कहा, चुनाव आयोग ने कुछ सोच-समझकर ही चुनाव की इतनी लंबी अवधी रखी होगी… आशा है कि चुनाव स्वतंत्र और निष्पक्ष होगा… अगर चुनाव आयोग कार्रवाई करती है तो सभी पक्षों को समानता दी जाए…" pic.twitter.com/hCBtQ9bq48
— ANI_HindiNews (@AHindinews) March 16, 2024
लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने पाचवी यादी जाहीर केली आहे. समाजवादी पार्टी नेता धर्मेंद्र यादव आझमगढमधून निवडणूक लढवणार आहेत.
लोकसभा चुनाव के लिए समाजवादी पार्टी ने 5वीं लिस्ट जारी की। समाजवादी पार्टी नेता धर्मेंद्र यादव आज़मगढ़ से लड़ेंगे चुनाव। pic.twitter.com/xXlhH0OBwB
— ANI_HindiNews (@AHindinews) March 16, 2024
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, राजकीय पक्षांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टाळाव्यात. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान द्वेषपूर्ण भाषणे देऊ नयेत. स्टार प्रचारकांच्या हाती नियमावली सोपवा.
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या वेळापत्रकाच्या घोषणेवर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, “आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गोव्यात 7 मे रोजी निवडणुका होणार आहेत. मी निवडणूक आचारसंहितेचे स्वागत करतो. त्यांनी सर्व माहिती दिली आहे.गोवा सरकार निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे.”
देशातील मतदारांचा EVM वर विश्वास नाही. तरीपण आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे निवडणुक आयोग इतर केंद्रीय तपास यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातील बाहुल्यासारखं वागणार आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला.
निवडणूक आयोगाचं दबावाखाली काम सुरू आहे. देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. देशात पारदर्शक निवडणुका होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकत नाही- खासदार संजय राऊत
मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. आम्ही आमचे उमेदवार ठरवले नाही मग सर्वे कसं काय ठरू शकतात असं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
वादळी वाऱ्या सह पावसाने हजेरी लावली, काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी झाड पडली. जोरात असलेल्या हवेच्या धुळं उडाल्याने रस्त्यावरील नागरिक हैराण झाले. नागपूरच्या ग्रामीण भागात काटोल परिसरात सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी.
नवी दिल्ली : 7 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, सांगली, सातारा, मावळ, पुणे, शिरूर, माढा कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.
नवी दिल्ली : 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघासाठी मतदान होणार आहे. तर, 26 एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम या मतदारसंघात मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
नवी दिल्ली : रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर, 13 मे मावळ आणि पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघात 20 मे रोजी मतदान होणार आहे.
नवी दिल्ली : उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी या लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर दिंडोरी, नाशिक आणि धुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.
नवी दिल्ली : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. या सहा मतदारसंघामध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ, मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ, मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ, मुंबई उत्तरमध्य लोकसभा मतदारसंघ, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : 19 आणि 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
नवी दिल्ली : एव्हिएम मशीनवर काही जण संशय व्यक्त करतात. पण, एव्हिएम मशीनची चाचणी तीन वेळा केली जाते. त्यावेळी उमेदवारही समोर असतात. मात्र, सोशल मिडीयावर आता अनेक संधोधक तयार झाले आहेत. एव्हिएम मशीन पूर्ण सुरक्षित आहेत असे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 सात टप्प्यात होणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्रातील विदर्भात दुसऱ्या टप्प्यात तर कोल्हापूर, सांगली आणि कोकणमध्ये तिसर्या टप्प्यात मतदान होणार आहे.
लोकसभेसाठी महाराष्ट्रात 5 व्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार , तर 25 मे ला होणार सहाव्या टप्प्यातील मतदान होणार. 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार असून चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडणार आहे.
पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला होणार आहे.
4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार.
लोकसभेच्या निवडणुका 7 टप्यात होणार. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार.
सिक्कीम, ओदिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेशमध्ये विधनासभा निवडणूक होणार.
आंध्र प्रदेश – 13 मे 2024, अरूणाचल प्रदेश – 19 एप्रिल 2024, सिक्कीम – 19 एप्रिल 2024
महाराष्ट्रासह 26 जागांवर पोटनिवडणुका होणार.
द्वेष निर्माण होतील अशी वक्तव्यं प्रचारात करू नका. प्रचारात कुणावर वैयक्तिक टीका करू नका. राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांना नियमांची माहिती द्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले.
निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मसल पॉवर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांसोबत काम करणार . मसल पॉवर, मनी पॉवर रोखण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं.
निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. मतदाराला तक्रार असल्यास सी-व्हिजील ॲपवर नोंदवता येईल.
मतदानाबाबतची कोणतीही माहिती हवी असल्यास ती वेबसाईटवर मिळेल. उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवर मिळणार आहे. गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या उमेदवारांना त्याची माहिती वृत्तपत्रातून द्यावी लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या साईटवरही गुन्हेगारांची माहिती राहणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
यंदा महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 85 लाख नव्या महिला मतदारांची नोंद झाली आहे. देशात 82 लाख मतदार 85 वर्षावरील आहेत. 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत. तसेच 1 एप्रिल रोजी ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा करण्यात येणार. 85 वर्षांवरील व्यक्तींसाठी घरी जाऊन मतदान करून घेणार. पोलिंग बूथवर येऊ न शकणाऱ्यांसाठीही घरोघरी मतदानाची सोय करण्यात येईल.
प्रत्येक बूथवर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सोय असेल. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छताची सोयही असेल.
आपल्या देशात 97 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी. देशातील निवडणूक म्हणजे एक सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. 16 जूनला 17 व्या लोकसभेची मुदत संपत आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होतील. – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार.
चुनाव का पर्व, देश का गर्व
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, लोकसभा निवडणुकांच्या तारखांची होणार घोषणा
महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. जागा वाटपावर आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ – देवेंद्र फडणवीस
सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे. आता दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल असा आमचा विश्वास आहे. – मुख्यमंत्री शिंदे
विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची सरकारची भूमिका – मुख्ममंत्री एकनाथ शिंदे
सोयाबीन आणि कापसासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विणकर समाजासाठी आता आर्थिक विकास महामंडळ – मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून सरकार काम करतंय. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मातोश्रीवर भेटीपुर्वी राजू शेट्टी हे संजय राऊत यांची मुंबईत घेणार भेट.हातकणंगले मतदार संघातून निवडणुक लढवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहीती…
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका. पक्षचिन्ह आणि नावाबाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिका. याचिकेवर 19 मार्चला होणार सुनावणी
माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल. माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. मला श्रीकांत शिंदे यांचा फोन आला. मला अस्वस्थ आहात का विचारले, असे संजय मंडलिक यांनी म्हटले.
पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या बैठकीत निर्णय. मागील काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये वाहन तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
नंदुरबार- नंदुरबार लोकसभेच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे आमदार आणि शिंदे गटाचे संपर्कप्रमुख यांच्यात गुपित भेट झाली. आमदार के. सी. पाडवी यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयाला जाऊन भेट घेतली. शिंदे गटाच्या भाजपाच्या उमेदवार हिना गावित यांना विरोध असल्याने काँग्रेस आणि शिंदे गटाच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
कोल्हापूर- “माझी उमेदवारी लवकरच जाहीर होईल. माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मला श्रीकांत शिंदे यांचा फोन आला होता. मी अस्वस्थ आहे का असं त्यांनी मला विचारलं. उमेदवारी जाहीर होईल असंही त्यांनी मला सांगितलं आहे,” अशी प्रतिक्रिया संजय मंडलिक यांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा आणि निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. येत्या 19 मार्चला दिल्लीत ही बैठक होणार आहे. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित राहणार आहेत. तर राज्यातून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे सहभागी होणार आहेत.
थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळची बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी ठाण्यातील निवासस्थानावरून मुंबईच्या दिशेने सकाळीच रवाना झाले. आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे.
दक्षिण मुंबईत शिवसेनेचा उमेदवार द्या अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांनी सह्यांचं पत्र पठवले आहे. दक्षिण मुंबईत भाजपच्या राहुल नार्वेकरांनी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. दक्षिण मुंबईतल्या दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी सह्या करून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. ठाणे, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून रस्सीखेच सुरु आहे.
महायुतीतील प्रत्येक पक्षाला वाटत आहे तिकीट मिळावं आणि ते योग्य आहे मात्र मी संन्यास घेणार नाही असं विधान खासदार उदयनराजे यांनी केलं आहे. भाजपच्या दोन याद्यांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव वगळले गेले आहे
या आठवड्याच्या अखेरीस सोने-चांदीत पुन्हा दरवाढ झाली. सोने महागले तर चांदी पण वधारली. त्यामुळे ग्राहकांना सराफा बाजारात अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला. त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला.
ईडी, इतर संस्था, अधिकारी हे भाजपचे हप्ता वसूली एजंट असल्याची घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली. विरोधकांवर भाजप सरकार दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटातील धुसफूस पण चव्हाट्यावर आली आहे. अंबादास दानवे हे नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर डावलत असल्याचा आरोप केला आहे.
माढा लोकसभेवरून महादेव जानकर यांच्या घरातच संघर्ष पेटला… पुतण्या स्वरुप जानकर हे माढा लोकसभेची निवडणूक लढवणार… ते सातत्याने सांगतात पुतण्या राजकारणात येणार नाही पण मी राजकारणात येणार आहे… जानकर साहेब कुटुंबाशी सुसंवाद करत नाहीत… त्यांनी परभणीतून लढावं किंवा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून लढावं… मात्र ते माढा मधून निवडणूक लढवणार असतील तर माझी उमेदवारी अटळ आहे… स्वरूप जानकर यांनी घेतली भूमिका
महाविकास आघाडीचे नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक. जयंत पाटील सिल्व्हर ओके वर दाखल. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्निथला व इतर नेते सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत
मोदींच्या रोड शो ला न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर परवानगी. 18 मार्च रोजी कोइंबतोर येथे 4 किलोमीटर अंतराचा नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार होता. स्थानिक प्रशासनाने मोदींच्या रोड शो ला परवानगी द्यायला नकार दिला होता. भाजपने या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने मोदींच्या रोड शो ला परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत
लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून अपात्र व्यक्तींची यादी जाहीर . महाराष्ट्रातील एकूण 18 जणांचा यादीत समावेश. निवडणुकातील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे अपात्र ठरलेल्या लोकांची यादी प्रसिद्ध. या व्यक्तींना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही.
लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी गांधी घराण्याबाबतची मोठी बातमी. राहुल गांधी यावेळी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवणार. अमेठी मधून राहुल गांधी निवडणूक लढवणार नाहीत. पुन्हा एकदा वाईनाड मधूनच राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार.
आज निवडणुकीची घोषणा होणार आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स eci.gov.in या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज दुपारी पत्रकार परिषद घेतील. आणखी दोन आयुक्तही यावेळी उपस्थित असतील. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे.
आज दुपारी निवडणुकीची घोषणा होणार आहे. सहा ते सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडू शकते. 18 ते 20 एप्रिल दरम्यान पहिल्या टप्प्यातील मतदान होऊ शकतं.
आज निवडणुकांची घोषणा होणार आहे. लोकसभेसह विधानसभा निवडणुकांचीही घोषणा होणार आहे. आंध्रप्रदेश, ओडिसा, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या चार राज्यांच्या निवडणुकांचीही घोषणा आज होऊ शकते.