‘लोक विकास’ उपक्रमामुळे धाराविकरांना मोठा दिलासा, कल्याणकारी योजनेत नोंदणी झाली सोपी, 300 पेक्षा अधिक कुटुंबांना फायदा

| Updated on: Dec 06, 2024 | 6:21 PM

धारावी सोशल मिशनच्या (DSM) 'लोक विकास' या उपक्रमाच्या माध्यमातून धारावीतील 300 हून अधिक नागरिकांची महत्त्वाच्या सरकारी कल्याणकारी योजेंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.

लोक विकास उपक्रमामुळे धाराविकरांना मोठा दिलासा, कल्याणकारी योजनेत नोंदणी झाली सोपी, 300 पेक्षा अधिक कुटुंबांना फायदा
Follow us on

धारावी सोशल मिशनच्या (DSM) ‘लोक विकास’ या उपक्रमाच्या माध्यमातून धारावीतील 300 हून अधिक नागरिकांची महत्त्वाच्या सरकारी कल्याणकारी योजेंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. 19 ऑक्टोबर आणि 16 नोव्हेंबरला झालेल्या लोक विकास कार्यक्रमामध्ये 197 वक्तींची नावनोंदणी करण्यात आली. ज्यांची नाव नोंदणी झाली त्यातील काही जणांना आतापर्यंत अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे. तर परिसरातील तीनशेहून अधिक कुटुंबांना या उपक्रमाने या आधीच अंदाजे 10 कोटी रुपयांचा वैद्यकीय विम्याच्या लाभ देखील मिळून दिला आहे.

जेथे बहुसंख्य लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, त्या भागात आयुष्मान भारत,  ई-श्रम कार्ड आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासारखे कल्याणकारी कार्यक्रम अत्यंत आवश्यक असलेली आर्थिक आणि आरोग्य सुरक्षा प्रदान करतात. तथापि, जागरूकतेचा अभाव आणि सायबर गुन्ह्यांबद्दलची भीती यासारखी आव्हाने अनेकदा रहिवाशांना हे लाभ मिळवण्यापासून वंचित ठेवतात. मात्र नागरिकांमध्ये असलेली ही भीती दूर करण्याचं काम  लोक विकास उपक्रमातून सूरू आहे.

या कार्यक्रमात सहभागी झालेले लाभार्थी उमेश सोनार यांनी स्वतः आणि त्यांची पत्नी पुष्पा यांच्यासाठी ‘लोक विकास’च्या माध्यमातून आयुष्मान भारतमध्ये नोंदणी प्रक्रिया कशी सुलभ झाली याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की,  “अगोदर आम्ही आधारचा गैरवापर होण्याची भीती आणि सायबर गुन्ह्यांबाबतची चिंता यामुळे नोंदणी करण्यास घाबरत होतो. मात्र ‘डीएसएम’च्या मदतीमुळे आम्हाला सुरक्षित वाटले आणि याबाबतचा आत्मविश्वासही वाढला.”

या कार्यक्रमाचा प्रभाव फक्त नाव नोंदणीपुरता मर्यादित नसून, त्याही पलीकडे पोहचला आहे. अनेकांना हा कार्यक्र्म आवश्यक सामाजिक संरक्षणासाठी जीवनरेखा वाटू लागला आहे. “मी ई-श्रम कार्ड योजनेत नाव नोंदवले आणि प्रक्रिया सुरळीत वाटू लागली. बऱ्याच लोकांना या फायद्यांबद्दल माहिती नसते, परंतु आम्ही चुकू नये हे ‘लोक विकास’ सुनिश्चित करतो,” असे व्यवसायानं  स्वयंपाकी असलेल्या ४८ वर्षीय सिलारबी शेख यांनी म्हटलं आहे.

धारावी सोशल मिशनचा सर्वसमावेशक दृष्टिकोन रहिवाशांना भेडसावणाऱ्या अडथळ्यांना दूर करून, कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये नावनोंदणी करण्यासाठी मोफत, सुरक्षित सहाय्य देऊ करतो. सामाजिक कार्यकर्त्या भाग्यलक्ष्मी यांनी त्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “अनेक लोकांसाठी या योजना म्हणजे सुरक्षा जाळ्या आहेत. त्यातून कोणीही मागे राहणार नाही याची डीएसएम काळजी घेत आहे.”