मुंबई : शिवसेनेत मोठी फूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सर्वाधिक आमदार आणि खासदार तसेच पक्षाचे नाव आणि चिन्हं सारंच गेलं आहे. त्यामुळे लोकसभांच्या निवडणूकांत आता मतदार आणि कार्यकर्ते नक्की कोणाच्या बाजूने आहेत याची लिटमस टेस्ट 4 जूनलाच होणार आहे. लोकसभा निवडणूकीत मुंबईतील सहा जागांवरील मतदान ठरविणार आहे की शिवसेना नक्की कोणाची आहे. त्यात आता शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी एका विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा दोन गट पडले आहेत. त्यातील खरा पक्ष कोणाच्या बाजूने आहे हे लवकरच समजणार आहे. यावेळी बारामतीत जसे एकाच पवार घरातील दोन सदस्य एकमेकांविरोधात लढले. तसाच काही प्रकार मुंबई उत्तर – पश्चिम लोकसभा मतदार संघात होणार होता. परंतू ऐनवेळी मुलगा अमोल विरोधात लढण्यास खासदार गजानन कीर्तिकर यांनी नकार दिला होता.
गजाजन कीर्तिकर यांनी सांगितले की एकाच घरात दोन पक्ष हे दुर्दैव आहे अशी राजकीय परिस्थिती कुणाच्या वाटेला येऊ नये. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात अमोल असला तरी मला अमोलसाठी काम करावं लागलं आणि मी ते काम केलं असे खासदार गजानन कीर्तिकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.
कर्तव्य पार पाडव लागतं..मात्र ते कठीण जातं…त्रासदायक असतं कुणाच्या वाटेला हे येऊ नये असं वाटत असेही गजानन कीर्तिकर यावेळी म्हणाले. अमोलच्या विरोधात मी नाही. त्यांचं म्हणणे असं होत की मी पक्ष सोडू नये. तसंच मत पत्नी, मुलगा, सुन यांचं होतं. मी 57 वर्षे पक्षाचं काम करत होतो, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम केलं…नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं..मात्र या शिवसेनेचा प्रवाह वेगळ्या दिशेने गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं असे ते म्हणाले.
मुलाचं टर्निंग पॉईंट जरूर आहे. तेव्हा त्या पक्षात नगरसेवक किंवा आमदारकीची उमेदवारी दिली नाही. कांदिवलीची थोड्या काळासाठी आमदारकी मिळाली आता खासदारकी दिली. आयुष्याची जडण घडण करण्याची जबाबदारी त्या पक्षाने सांभाळलेली नाही. टूर्निंग पॉईंट येऊ शकेल. दोन्ही उमेदवार तोडीचे आहेत असे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा निवडणूकांबाबत गजानन कीर्तीकर यांनी सांगितले. या लोकसभा मतदार संघात शिंदे सेनेचे रवींद्र वायकर विरोधात गजानन कीर्तिकर यांचे पूत्र उबाठाचे अमोल कीर्तिकर उभे आहेत. अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर खिचडी घोटाळ्यातील आरोपी म्हणून ईडीचे चौकशी समन्स आले आहेत.